शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आघाडी सरकार अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:43+5:302021-04-12T04:20:43+5:30
अनवली (ता. पंढरपूर) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, विदर्भ अध्यक्ष दामूअण्णा इंगोले, विद्यार्थी ...
अनवली (ता. पंढरपूर) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, विदर्भ अध्यक्ष दामूअण्णा इंगोले, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, जिल्हा संघटक शहाजान शेख आदी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कराड, इंदापूर, बारामती आदी ठिकाणी ऊस दरासाठी आंदोलने केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला व दुधाला दर मिळाला. शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना आहे. शेतकरी त्यांना निवडणुकीत आर्थिक स्वरूपाची मदतही करत आहेत, असेही बागल म्हणाले.
खताच्या किमती वाढल्या आहेत. लाॅकडाऊन काळात शेतीमालाचे दर पडले आहेत. अशा स्थितीमध्ये कारखानदारांनी एफआरपीचे पैसे थकवले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. यावेळची लढाई ही कारखानदार विरुद्ध सामान्य शेतकऱ्याचा मुलगा अशी आहे, असे रविकांत तुपकर म्हणाले.