जाणून घ्या; संचारबंदी काळात कोणत्या गोष्टींना आहे सुट..!
By Appasaheb.patil | Published: March 25, 2020 11:28 AM2020-03-25T11:28:45+5:302020-03-25T11:28:51+5:30
सोलापुरात संचारबंदी लागू; चौकाचौकात आहे सोलापूर शहर पोलिसांची नाकाबंदी
सोलापूर : COVID19 चा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात बंदी आदेश. या अधिसूचनेनुसार अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना पुढील निर्बंधातून सूट.
👇बंदी आदेशातून सूट👇
➡किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये
➡किमान मनुष्यबळासह बॅंका/एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लिअरींग ऑपरेशन्स, म्युच्युअल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) व अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या
➡मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे
➡टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा
➡अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक
➡शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात
➡मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे
➡टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा
➡अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक
➡शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात
➡बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ, कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन, साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा
➡खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण
➡खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण
➡बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा
➡उपाहारगृहांमधून घरपोच सेवा
➡औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखाद्य, चारा निर्मिती घटक इत्यादी
➡रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक
➡पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज, त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था
➡टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा
➡पावसाळ्यापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे
➡अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था
➡अत्यावश्यक सेवांना किंवा कोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणाऱ्या खासगी आस्थापना.
➡वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी
➡वरील सर्व निर्बंध लोकांच्या वाहतुकीवर, वस्तूंच्या दळण-वळणावर नाहीत.
➡अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था, संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक.