जाणून घ्या;  डाळिंब शरीरासाठी कसे आहे पोषक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 07:20 PM2021-06-25T19:20:28+5:302021-06-25T19:20:43+5:30

सोलापूर लोकमत विशेष...

Learn; How pomegranate is nutritious for the body ...! | जाणून घ्या;  डाळिंब शरीरासाठी कसे आहे पोषक...!

जाणून घ्या;  डाळिंब शरीरासाठी कसे आहे पोषक...!

Next

डाळिंबाचे दाणे पाहताक्षणी आपणास पिंजरा चित्रपटातील गाण्याची आठवण होते (डाळिंबाचे दाण तुझ्या पिळलग ओठावरी ) या ओळी आठवतात व लाल मोती  आपल्या नजरेसमोर दिसतात 

तर हेच डाळिंब आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक आहे त्यात पुढील घटक आढळतात व्हिटामिन सी , व्हिटामिन के , व्हिटामिन बी , फायबर , लोह , पोटॅशियम , ओमेगा ६ व फॅटी अॅसिड असे अनेक घटक आढळतात म्हणून डाळिंब आपल्या आहारात महत्त्वाचे स्थान धारण करते डाळिंबा मुळे आपण सेवन केलेल्या आहाराचे पचन होण्यास मदत मिळते . यांच्या सेवनामुळे आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढून ते निरोगी राहण्यास मदत मिळते . शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो शरीरातील वाढलेली उष्णता कमी होते.

खोकला लागून घशात खरखर  होत असताना  डाळिंबाची साल उकळून त्याचा काढा करून द्यावा. नियमित पित्त होत असल्यास डाळिंबाचा ज्यूस घेतला तर वाढलेले पित्त कमी होण्यास मदत मिळते. आपणास अपचन झाल्यामुळे ताप येणे किंवा आम्लपित्ताचा त्रास होऊ तोंडाला दुर्गंध असा वास येतो त्यावेळी डाळिंबाची साल पाण्यात उकळून गुळण्या कराव्यात किंवा डाळिंबाचे दाणे चावून खावे. डाळिंबाच्या नियमित सेवनामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, आपली त्वचा तजेलदार बनते, आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाळिंब फार उपयोगी सिद्ध होते. सांधेदुखी, मुळव्याध, रक्तदाब , बद्धकोष्ठता अशा अनेक समस्यांवर डाळिंब हे अतिशय उपयोगी ठरते शरीरातील कमी झालेले हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळिंब फार महत्त्वाची भूमिका साकारते. सोलापूर , उस्मानाबाद , अहमदनगर या महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये डाळिंबाचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते सोलापूर तर डाळिंब संशोधन केंद्र उभारण्यात आलेले आहे. चला तर मग अशा बहुगुणी डाळींबाचे आपण आपल्या रोजच्या आहारात समावेश करू या

- क्रांतीवीर महिंद्रकर 

योग निसर्गोपचार व संमोहन तज्ञ, सोलापूर

Web Title: Learn; How pomegranate is nutritious for the body ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.