जाणून घ्या; बहुगुणी संत्रीचे काय आहेत नेमके फायदे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 03:39 PM2021-07-08T15:39:17+5:302021-07-08T15:39:23+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
आपल्या देशात ज्या फळाला प्राधान्य दिले जाते त्यापैकी संत्री हे एक आगळेवेगळे स्थान मिळवून आहे याचे रासायनिक महत्त्व आहे संत्री हे एक प्रमुख रसदार फळ आहे संत्रा मध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आहे आयुर्वेदाचे सुप्रसिद्ध चिकित्सक महर्षी चरक व सुश्रुत यांनी संत्री हे जेवणामध्ये रुची वाढवणारे व आतड्यांची शुद्धी करणारे हृदयाला बलप्रधान करणारे फळ आहे असे सांगितले.
संत्री सेवनामुळे स्नायू , हृदय , व मस्तिष्क यांना नवचेतना व ताजेपणा प्रधान करते अति ताप आल्यास ताप कमी करण्यास संत्री लाभदायक ठरते त्यामध्ये सायट्रिक ऍसिड असल्यामुळे लघवीचे व किडनीचे आजार बरे होण्यास व लघवी साफ होण्यास मदत मिळते.
पोटात गॅस , स्नायुच्या वेदना , उच्च रक्तदाब , त्वचारोग , अपचन , जुलाब , गर्भवती महिला , यकृताची रोगी यासाठी संत्री अतिशय लाभदायक ठरते . गर्भवती महिला शेवटचे 1 / 2 महिने नियमित सकाळ व संध्याकाळ एक ग्लास संत्र्याचे रस घेतल्यास जन्मणारे बाळ गौर वर्णचे जन्मते व गर्भावस्थेत मळमळ-उलटी यापासून सुटका मिळते.
संत्र्यांमध्ये व्हिटामिन ए असल्यामुळे डोळ्यासाठी भरपूर फायदा होतो व डोळ्याचे आजार बरे होण्यास मदत मिळते. लहान मुलाला संत्र्याचे रस एखाद्या टॉनिक सारखे काम करते लहान बाळाचे दात निघत असताना हिरवे पिवळे जुलाब होत असतात अशावेळी संत्र्याचे रस औषधी रूपाचे काम करते संत्रे हे नियमित सेवन केले तर बऱ्याच आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो यासाठी याचा फार उपयोग होतो जुलाब लागल्यामुळे होणारा थकवा दूर होतो संत्री किंवा संत्र्याचे ज्युस मानसिक ऊर्जा प्रदान करते जी व्यक्ती सतत मानसिक श्रम करतो त्याला संत्री खाणे फार लाभदायक ठरते. संत्र्याचा वापर करत असताना आपल्या तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
- क्रांतीवीर महिंद्रकर
योग निसर्गोपचार व संमोहन तज्ञ