पंढरपुरातील मठ मोकळे ठेवा अन्यथा गुन्हा दाखल होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:42 AM2021-02-21T04:42:07+5:302021-02-21T04:42:07+5:30

माघ वारीच्या पार्श्भूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पोलिसांना सूचना देण्यासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

Leave the monastery in Pandharpur empty otherwise the crime will be filed | पंढरपुरातील मठ मोकळे ठेवा अन्यथा गुन्हा दाखल होईल

पंढरपुरातील मठ मोकळे ठेवा अन्यथा गुन्हा दाखल होईल

googlenewsNext

माघ वारीच्या पार्श्भूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पोलिसांना सूचना देण्यासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी पंढरपूर उप विभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, प्रशांत भस्मे उपस्थित होते.

पुढे झेंडे म्हणाले, स्थानिक नागरिकांना एसटी ने पंढरपुरात येण्यास मज्जाव नाही. परंतु भाविकांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर यात्रेपूर्वी पंढरीतील यामध्ये अनेक वारकऱ्यांनी मुक्काम केला आहे. वारकऱ्यांनी शनिवारी रात्री बाराच्या आत पंढरपुरातून माघारी जायचे आहे.

मठांची तपासणी करण्यासाठी चार पथके नेमण्यात आले आहेत. ज्या मठामध्ये रविवारी भाविक असल्याचे आढळून येतील, त्या संबंधीत मठाधिपतींवर गुन्हा दाखल करणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले.

असा आहे पोलीस बंदोबस्त

जिल्हा पोलीस अधीक्षक २

उपविभागीय पोलिस अधिकारी ३,

पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक / उप पोलीस निरीक्षक ९०,

पोलीस कर्मचारी ८००, दंगा काबू पथक १, एस आर पी एफ १ कंपनी

होमगार्ड - ६००

----

Web Title: Leave the monastery in Pandharpur empty otherwise the crime will be filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.