पंढरपुरातील ८९२ घरकुल्याच्या लॉटरीची सोडत सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:22+5:302021-03-06T04:21:22+5:30
पंतप्रधान योजनेची माहिती देण्यासाठी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, ...
पंतप्रधान योजनेची माहिती देण्यासाठी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, उपनराघ्यक्षा श्वेता डोंबे, नगरसेवक अनिल अंभगराव, नागेश भोसले, सुजित सर्वगोड, गुरुदास अंभयकर, डिराज सर्वगोड उपस्थित होते.
भोसले पुढे म्हणाल्या, पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाच्या कामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध संघटनांनी तक्रारी केल्या होता. या कामास स्थगिती देण्याचे आदेश नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. यामुळे पंढरपूर पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला स्थगिती दिली होती. त्याचबरोबर प्रकल्पातील ८९२ घरांचे काम पूर्ण झाले होते. यामुळे या ८९२ घरांची लॉटरी सोडत २६ जानेवारीला होणार होती. मात्र घरांच्या लॉटरी सोडतीला देखील स्थगिती दिली होती. परंतु संरक्षक भिंतीची उंची वाढवण्याच्या आदेश देऊन स्थगिती उठवण्यात आली असल्याची माहिती साधना भोसले यांनी दिली.
फाेटो : पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहात माहिती देताना नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व अन्य नगरसेवक.