सोलापूर स्मार्ट सिटीमधील एलईडीचा बेसलाईन सर्व्हे सुरू, लवकरच बल्बही बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:30 PM2018-12-13T12:30:13+5:302018-12-13T12:32:54+5:30
सोलापूर : शहरातील पथदिव्यांवर एलईडी दिवे बसविण्यासाठी ईईएसएल कंपनीने बेसलाईन सर्व्हे सुरू केला आहे. बुधवारी संभाजी चौक ते शिवाजी ...
सोलापूर : शहरातील पथदिव्यांवर एलईडी दिवे बसविण्यासाठी ईईएसएल कंपनीने बेसलाईन सर्व्हे सुरू केला आहे. बुधवारी संभाजी चौक ते शिवाजी चौक यादरम्यानच्या पथदिव्यांवर नोंदी करण्यात आल्या. सर्वेक्षणाचे काम जसजसे पूर्ण होईल. त्या पाठोपाठ एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती मनपाच्या विद्युत विभागाचे सहायक अभियंता राजेश परदेशी यांनी दिली.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत महापालिकेने अनेक स्मार्ट कामे सुरू केली आहेत. यामध्ये पथदिव्यांवरील जुने दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिका आणि ईईएसएल कंपनीमध्ये नुकताच करार झाला आहे. त्यानुसार ईईएसएल कंपनीने सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. पहिल्या दिवशी संभाजी चौक ते शिवाजी यादरम्यानच्या पथदिव्यांवर नोंदी करण्यात आल्या. रस्त्याची रुंदी, पोलची उंची, वाहतुकीचे प्रमाण आदी माहितीची नोंद करण्यात आली. यानुसार शहरातील सर्वच पथदिव्यांच्या नोंदी केल्या जातील.
महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचाºयांनी अधिकारी आणि पदाधिकाºयांच्या सूचनेनुसार पथदिव्यांवर वेगवेगळ््या वॅटचे दिवे बसविले आहेत; मात्र ईईएसएल कंपनी नॅशनल लायटनिंग कोडनुसार निश्चित झालेल्या वॅटचे एलईडी दिवे बसविणार आहे. महापालिकेच्या आवारातच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. एलईडी दिवे बसविल्यानंतर महापालिकेच्या वीज बिलात ४० टक्के बचत होणार आहे. ज्या भागातील सर्वेक्षण पूर्ण होईल, त्या भागातील पथदिव्यांवर एलईडी बसविण्याचे काम सुरू होईल. येत्या सहा महिन्यात संपूर्ण शहरातील पथदिव्यांवर एलईडी बसविण्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
कक्ष स्थापन होणार
- महापालिकेच्या आवारातच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. एलईडी दिवे बसविल्यानंतर महापालिकेच्या वीज बिलात ४० टक्के बचत होणार असल्याची माहिती परदेशी यांनी दिली.