भिवरवाडी येथे गाई व वासरावर बिबट्याचा हल्ला; करमाळा परिसरात भितीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 10:50 AM2020-12-14T10:50:02+5:302020-12-14T10:50:56+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Leopard attack on cows and calves at Bhiwarwadi; An atmosphere of fear in the Karmala area | भिवरवाडी येथे गाई व वासरावर बिबट्याचा हल्ला; करमाळा परिसरात भितीचे वातावरण

भिवरवाडी येथे गाई व वासरावर बिबट्याचा हल्ला; करमाळा परिसरात भितीचे वातावरण

googlenewsNext

करमाळा : बिबट्याने दोन दिवसांपासून हल्ला केलेला नसल्याने किंवा रविवारच्या दिवशी दिवसभरात बिबट्या आढळून न आल्याने बिबट्या करमाळा तालुक्यात आहे का निघून गेला याबाबत संभ्रम तयार झाला होता. तसेच माढा परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे मिळून आले होते. त्यामुळे करमाळ्यातील बिबट्या हा माढ्याच्या दिशेने गेला का असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. पण त्यावर पुन्हा एकदा पूर्णविराम लागला असून त्याने भिवरवाडी येथे गायीवर व वासरा वर हल्ला केला आहे. त्यामुळे बिबट्या अजूनही त्याच परिसरात असल्याची शक्यता आहे.

 

रविवारी ढोकरी हद्दीतील भानुदास सलगर यांच्या शेतात बिबट्या खात्री ने आहे असे लोक सांगत असताना ही वन विभाग व संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले . आणखी एखाद्या नागरिकाचा बळी घेतल्यावर वनविभाग व इतर यंत्रणा जागी होणार का ? असाही प्रश्न लोक विचारु लागले आहेत. बिबट्याच्या शोध घ्यायला व त्याला ठार मारणे वनविभागाला शक्य नाही का ? त्यांना त्याला मारायचे नाही असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता मात्र लोकांचा संयम सुटत चालला आहे.

मागील अनेक दिवसापासून कोरोना नंतर बिबट्याच्या भितीने लोकांच्या व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनातुन सावरण्याआधी बिबट्यामुळे अडकले आहेत. वनविभाग यातुन कधी बाहेर काढेल याचीच प्रतिक्षा नागरीक करीत आहेत. पण विभाग पार्ट टाईम जॉब केल्यासारखे वागत आहे. तो जंगली प्राणी आहे २४ तासात कधीही कुठेही हल्ला किंवा बाहेर निघु शकतो तर मग त्याला पकडण्यासाठी रात्रीची यंत्रणा का तयार केली जात नाही.

Web Title: Leopard attack on cows and calves at Bhiwarwadi; An atmosphere of fear in the Karmala area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.