माढा तालुक्यात बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:21 AM2020-12-29T04:21:25+5:302020-12-29T04:21:25+5:30

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, उंदरगाव ते उपळाई खुर्द रस्त्यावर पारडे वस्तीच्या परिसरात रविवारी सायंकाळी बंडू पारडे या ...

Leopard sighting in Madha taluka | माढा तालुक्यात बिबट्याचे दर्शन

माढा तालुक्यात बिबट्याचे दर्शन

googlenewsNext

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, उंदरगाव ते उपळाई खुर्द रस्त्यावर पारडे वस्तीच्या परिसरात रविवारी सायंकाळी बंडू पारडे या युवकास बिबट्या दिसला असल्याचे सांगितले जाते. बिबट्या दिसल्यानंतर त्याने घाबरलेल्या अवस्थेत दादासाहेब साठे यांना फोन करून माहिती दिली.

या महिन्याच्या सुरुवातीपासून माढा तालुक्यालगत असलेल्या करमाळा तालुक्यात बिबट्याने तीन जणाचे बळी घेतल्याने जरी तेथे बिबट्याला ठार मारले असले तरी अजूनही तेथील बिबट्याची दहशत कमी झालेली नसतानाच आता माढा तालुक्याच्या सीना काठच्या परिसरात बिबट्या दिसल्याच्या वृत्ताने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्या वनविभागाचे अधिकारी ‘त्या’ स्थळी येणार…

दरम्यान या संदर्भात माढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्या दिसल्याची माहिती समजली असल्याचे सांगत या संदर्भात मोहोळ वनविभागाशी संपर्क साधला असल्याचे सांगितले. सोमवारी वनविभागाचे अधिकारी येऊन त्या परिसराची पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Leopard sighting in Madha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.