बिबट्या चकवतोय ... लोकांना घाबरवतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:38 AM2020-12-12T04:38:25+5:302020-12-12T04:38:25+5:30

आष्टी तालुक्यात तीन बळी घेऊन करमाळा तालुक्यात आलेल्या नरभक्षक बिबट्याने फुंदेवाडी येथे ३ डिसेंबर रोजी कल्याण फुंदे, ...

Leopards are cheating ... scaring people! | बिबट्या चकवतोय ... लोकांना घाबरवतोय !

बिबट्या चकवतोय ... लोकांना घाबरवतोय !

Next

आष्टी तालुक्यात तीन बळी घेऊन करमाळा तालुक्यात आलेल्या नरभक्षक बिबट्याने फुंदेवाडी येथे ३ डिसेंबर रोजी कल्याण फुंदे, ५ डिसेंबर रोजी अंजनडोह येथे जयश्री शिंदे या महिलेचे शीर व धड वेगवेगळे करून ठार मारले. ७ डिसेंबर रोजी ऊसतोड मजुराची अल्पवयीन मुलगी फुलाबाई आटली हिला ठार केले. या तीन घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यासाठी २१ पिंजरे, तीन ड्रोन कॅमेरे,४२ ट्रॅप कॅमेरे, पाच शार्प शूटर, दोन बेशुद्ध करणारे पथक, एक डॉग स्कॉड अशा १६ वेगवेगळ्या टीमचा फौजफाटा आहे, पण गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही.

-----

कोण काय म्हणाले..

चिखलठाण येथे ऊसतोड मजुराच्या बालिकेवर हल्ला केल्यानंतर तो बिबट्या राजेंद्र बारकुंड यांच्या उसाच्या फडात लपला होता. तेथे बिबट्यास पकडण्याची वनविभागाला संधी होती, पण नियोजनाचा अभावामुळे मोहीम यशस्वी झाली नाही.

दत्तात्रय सरडे, उपसभापती, पंचायत समिती, करमाळा

------

नरभक्षक बिबट्याला नुसता धरायचेय की ठार मारायचेय हे वनविभागाच्या सुरू असलेल्या कारवाईवरून समजत नाही. बिबट्याला मारायला एवढे दिवस का लागतात.

- बिभीषण आवटे, जि. प. सदस्य

----

नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा कामाला लावली असतानाही बिबट्या वनविभागाला चकवा देत आहे. वनविभागाच्या पथकाला प्रशिक्षण असूनही ते का पकडू शकत नाहीत.

- भोजराज सुरवसे, सरपंच

----

बिबट्या रोज ठिकाण आणि मार्ग बदलत आहे. सध्या त्याचा वावर असलेल्या परिसरात उसाचे फड व केळीच्या बागा आहेत. त्यामुळे त्याला शोधणे अवघड जात आहे. सर्व यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे लवकरच बिबट्याला ठार करू.

- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक

Web Title: Leopards are cheating ... scaring people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.