Leprosy Day; नियतीनं केला कुष्ठरोग्यांच्या अवयवांवर हल्ला; आजूबाजूच्यांनी मारला हक्काच्या जमिनीवर डल्ला
By appasaheb.patil | Published: January 30, 2019 11:32 AM2019-01-30T11:32:22+5:302019-01-30T11:41:30+5:30
आप्पासाहेब पाटील सोलापूर : पडक्या भिंती़...ग़ळकी पत्रे...ना वीज, ना पाणी...ना अधिकारी येतात़...ना लोकप्रतिनिधी फिरकतात़.. वसाहतीसमोर घाणीचे साम्राज्य़..भटक्या कुत्र्यांचा उच्छाद़..अशा एक ...
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पडक्या भिंती़...ग़ळकी पत्रे...ना वीज, ना पाणी...ना अधिकारी येतात़...ना लोकप्रतिनिधी फिरकतात़.. वसाहतीसमोर घाणीचे साम्राज्य़..भटक्या कुत्र्यांचा उच्छाद़..अशा एक नव्हे अनेक समस्यांनी ग्रासलेल्या कुमठा नाका परिसरातील कुष्ठरोग वसाहतीची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे़ सेवा-सुविधांपासून ही वसाहत वंचित आहे. आता तर नियतीने अवयवांवर हल्ला केलेल्या कुष्ठरोग्यांच्या जमिनीवर डल्ला मारला जात आहे.
वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत असली तरी कुष्ठरोगाबाबत अद्याप पुरेसा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालेला नाही, अशीच प्रचिती सध्या सोलापुरातील कुष्ठरोग वसाहतीकडे पाहिले की लक्षात येते़ सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरात १९४९ साली हिंद कुष्ठ निवारण संघाची स्थापना करण्यात आली़ सुरूवातीला ३५० रूग्ण येथे वास्तव करीत होते.
१२५ एकर परिसरात विस्तारलेल्या या वसाहतीची आजची अवस्था वेगळीच आहे़ सुरूवातीच्या काळात या कुष्ठरोग रूग्णांना सिव्हिल सर्जनमार्फत सेवा-सुविधा पुरविल्या जात होत्या़ दरम्यान, १९८४-८५ साली महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले़ सुरूवातीच्या काळात चांगल्या सुविधा देणाºया महापालिकेकडून आताच्या काळात मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याची तक्रार व्यंकटेश पांडुरंग कुलकर्णी यांनी केली आहे.
५२ एकर जागा पडिक
कुष्ठरोग वसाहतमधील रूग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने विजापूर रोडवरील सोरेगाव परिसरात ५२ एकर जागा दिली़ या जागेतून येणाºया उत्पन्नातून काही दिवस या रूग्णांच्या सेवा-सुविधा पुरविल्या गेल्या़ मात्र कालांतराने या जागेकडे लक्ष देण्यास कोणीच नसल्याने ही ५२ एकर जागा सध्याच्या घडीला पडिकच आहे़
वसाहतीच्या जागेवर अतिक्रमण
- १९४९ साली हिंद कृष्ठ निवारण संघाची स्थापना झाली़ त्यावेळी १२५ एकर जागा संघाच्या नावाने होती़ सुरूवातीच्या काळात ३५० रूग्ण असलेली वसाहत आज फक्त ७० रूग्णांवर आहे़ कालांतराने या जागेवर लोकप्रतिनिधींकडून व परिसरातील नागरिकांकडून अतिक्रमण होऊ लागले़ ६० वर्षांच्या कालावधीत या संघाच्या १२३ एकर जागेवर अतिक्रमण झाले आहे़ आता या वसाहतीत फक्त ७० पेशंट असून, हे सर्वच निवाºयाविना राहतात़ घरावर ना पत्रे, ना कागद़़़उघड्या भिंतीत येथील रूग्ण जिवाची परवा न करताच राहतात़ या परिसरात लाईटची पुरेशी व्यवस्था नाही़ पाण्याची सोय नाही़ वसाहतीसमोर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे़ त्यामुळे दुर्गंधीयुक्त जागेत या रूग्णांना राहावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र आॅन दी स्पॉट रिपोर्टिंगदरम्यान दिसून आले़
दवाखाना बंद अवस्थेत...औषधाविना रूग्णांची हेळसांड
- रूग्णांना वेळेत व सवलतीत उपचार व्हावेत व वेळेवर औषधोपचार मिळावेत यासाठी या वसाहतीसमोर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दवाखाना उघडण्यात आला़ दोन खोल्यांच्या या दवाखान्यात सुरूवातीच्या काळात सेवा-सुविधाही देण्यात आल्या़ मात्र कालांतराने या दवाखान्याची अवस्था बिकट झाली़ उपलब्ध अधिकारी व कर्मचाºयांअभावी हा दवाखाना बंद करण्यात आला़ सध्या या दवाखान्याची जागा मद्यपींसाठी पोषक बनली असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले़
सात महिन्यांपासून दूध, ब्रेडचे देणे थकले...
- या वसाहतीत राहणाºया रूग्णांना नियमित दूध, ब्रेड व इतर औषधोपचार पुरविण्यात येतात़ मात्र मागील सात महिन्यांपासून हे साहित्य पुरविणाºयांचे देणे थकल्याने नियमित मिळणारे औषधे, अन्न मिळत नाही़ ना अधिकारी येतात, ना लोकप्रतिनिधी़ कोणाचेही या वसाहतीकडे लक्ष नाही़ अधिकाºयांना विचारायला गेल्यावर उडवाउडवीची उत्तरे देतात, अशीही तक्रार व्यंकटेश कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली़
सध्या या वसाहतीमधील रूग्णांना रेशन वाटप करतात तेही कमीच आहे़ आरोग्य अधिकारी नाही, जुन्या कपड्यांवरच जीवन जगत आहोत़ महापालिकेकडून मिळणाºया सेवा-सुविधा वेळेत मिळत नाहीत़ अधिकारी लक्ष देत नाहीत़ त्यामुळे या वसाहतीची अवस्था बिकट झाली आहे़ लवकर सेवा-सुविधा न पुरविल्या तर वसाहतीत एकही रूग्ण राहणार नाही़ महावितरणकडून तर महिन्याला ९० हजारांचे बिल येते़ १९८४ पासून या वसाहतीकडे संबंधित अधिकाºयांचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे़
- व्यंकटेश पांडुरंग कुलकर्णी
कुष्ठरोग वसाहत रूग्ण, कुमठा नाका, सोलापूर