सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार शेतकºयांची हमीभाव केंद्राकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:38 PM2018-05-16T13:38:07+5:302018-05-16T13:38:07+5:30

शासनाकडून फक्त ८००० शेतकºयांची तूर खरेदी

Lessons to 3,000 farmers' grievance centers in Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार शेतकºयांची हमीभाव केंद्राकडे पाठ

सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार शेतकºयांची हमीभाव केंद्राकडे पाठ

Next
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात आठ हमीभाव केंद्रावर तूर खरेदी झालीशासनाने मुदतवाढ दिल्यानंतर खरेदी सुरू झाली

सोलापूर: नोंदणी झालेल्या ११ हजार ९२ पैकी ७ हजार ७६० शेतकºयांची तूर १४ मेपर्यंत खरेदी झाली असून, नोंदणी केलेल्या सर्वच शेतकºयांना हमीभाव केंद्रातून मेसेज गेले असल्याचे सांगण्यात आले, परंतु शेवटच्या एका दिवसात म्हणजे मंगळवार  १५ मे रोजी ३३३२ शेतकºयांची तूर खरेदी झाली का?, हे बुधवारी समजणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात आठ हमीभाव केंद्रावर तूर खरेदी झाली आहे. या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी केली जाते. जिल्ह्यातून ८ केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकºयांची मुदतीत खरेदी झाली नसल्याने शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर खरेदी सुरू झाली आहे. तूर खरेदी १५ मेपर्यंतच करावयाची आहे.

१४ मेपर्यंत नोंदणी केलेल्यापैकी ७ हजार ७६० शेतकºयांची तूर खरेदी झाली होती. उर्वरित ३३३२ शेतकºयांची तूर खरेदी केवळ एका दिवसात करावयाची होती. नोंदणी केलेल्या सर्वच शेतकºयांना तूर खरेदीसाठी आणण्याबाबत मेसेज पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले; मात्र बºयाच शेतकºयांनी हमीभाव केंद्रावरील जाचक अटीमुळे व्यापाºयांना तूर विक्री केली असल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेवटच्या एका दिवसातही तूर खरेदीला म्हणावी तशी गर्दी नसल्याचे सांगण्यात आले. 


केंद्राचे नाव    नोंदणी शेतकरी    प्रत्यक्षात खरेदी (क्विं.)    
सोलापूर    १६७०        १२०८    १५,४९८
माळकवठे    ८३०        ६४१    ९३६७
बार्शी        १४०३        ८३४    ९०९९
दुधनी        १२१०        ८३६    १३,१६४
अक्कलकोट    १२८०        ९३१    ११८२४
कुर्डूवाडी    २२५०        १७३२    १६,६४५
करमाळा    ९४३        ७१८    ७०९९
मंगळवेढा    १५०६        ८६०    ८७२४
एकूण        ११०९२        ७७६०    ९१४२०

Web Title: Lessons to 3,000 farmers' grievance centers in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.