coronavirus; लग्नासाठी वऱ्हाडी मंडळींनी फिरविली पाठ; कार्यालयाऐवजी मशिदीतच उरकले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:16 PM2020-03-19T12:16:41+5:302020-03-19T19:39:13+5:30

कोरोनाचा परिणाम; लग्नसोहळ्याकडे पै-पाहुणे, वऱ्हाडी मंडळी, मित्रमंडळींनी पाठ फिरवली

Lessons for weddings and 3 bones circled; Unmarried wedding in the mosque instead of office | coronavirus; लग्नासाठी वऱ्हाडी मंडळींनी फिरविली पाठ; कार्यालयाऐवजी मशिदीतच उरकले लग्न

coronavirus; लग्नासाठी वऱ्हाडी मंडळींनी फिरविली पाठ; कार्यालयाऐवजी मशिदीतच उरकले लग्न

Next
ठळक मुद्देमंगल कार्यालयात लग्नविधी न करता मशिदीत काझी यांनी लग्न उरकते घेतले- मोजकेच मंडळी उपस्थित, गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय- जिल्ह्यातील मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश

करमाळा : कोरोना आजाराच्या भीतीमुळे शहरात आज दुपारी आयोजित लग्नसोहळ्याकडे वऱ्हाडी मंडळींसह सगेसोयरे व मित्रमंडळींनी पाठ फिरवली. त्यामुळे अत्तार कुटुंबीयांनी नवरदेवाची वरात न काढता व मंगल कार्यालयात लग्नसमारंभ न करता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये मशिदीत कबूल..क़बूल म्हणत लग्न उरकले.

करमाळ्यातील इलाही नूरमोहम्मद अत्तार यांची मुलगी अंजुम व अहमदनगरच्या गुंडेगाव येथील हुसेन बाबा अत्तार यांचा मुलगा समीर यांचा बुधवारी करमाळ्यातील नालबंद मंगल कार्यालयात लग्नसोहळा आयोजित केला होता. अत्तार कुटुंबीयांनी सगेसोयरे, मित्रमंडळी या सर्वांना या सोहळ्याचे आवर्जून निमंत्रण दिले होते.

लग्नात हजारो पै-पाहुणे येतील यामुळे दीड ते दोन हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था मंगल कार्यालयात केली होती. पण कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे लग्नसोहळ्याकडे पै-पाहुणे, वऱ्हाडी मंडळी, मित्रमंडळींनी पाठ फिरवली. वधू-वराकडील मंडळींनी विचार करून नवरदेवाची वरात न काढता व मंगल कार्यालयात लग्नविधी न करता मशिदीत काझी यांनी लग्न उरकते घेतले.

Web Title: Lessons for weddings and 3 bones circled; Unmarried wedding in the mosque instead of office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.