मुलांना शिकते करू.. उपळाईच्या शिक्षण परिषदेत व्यक्त झाला सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:59+5:302021-01-18T04:20:59+5:30
उपळाई बु. येथील नंदिकेश्वर विद्यालयात पार पडलेल्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक औदुंबर गायकवाड होते. यावेळी ...
उपळाई बु. येथील नंदिकेश्वर विद्यालयात पार पडलेल्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक औदुंबर गायकवाड होते. यावेळी केंद्रप्रमुख विजय काळे, श्रीकांत काशिद यांनी मार्गदर्शन केले. प्रशासकीय व गुणवत्तेबाबत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. स्वाध्याय उपक्रमाचे महत्त्व सांगण्यात आले. शाळासिद्धीची सात क्षेत्रे याविषयीही माहिती देण्यात आली.
या चर्चेत विजय काळे, श्रीकांत काशीद, सुहास चवरे, मोहन वसेकर, औदुंबर गायकवाड, पांडुरंग शिंदे, सोमनाथ चव्हाण, मंदाकिनी मिसाळ, प्रतिभा नवले, शकिना आतार, आदींनी सहभाग घेतला. प्रास्ताविक श्रीकांत काशीद यांनी, तर सूत्रसंचालन शब्बीर तांबोळी यांनी केले. याकामी औदुंबर गायकवाड, शब्बीर तांबोळी, दादा उबाळे, रिकिबे, जाधव, गवळी, भोरे, मोहन चव्हाण, आदींनी परिश्रम घेतले.
----