परप्रांतियांचा टाहो; हमे जाने दो साब... बच्चे, माँ-बाप हमारी राह देख रहे है़..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:32 PM2020-04-23T12:32:07+5:302020-04-23T12:33:59+5:30

मोडनिंंबच्या निवारा केंद्रातील लोकांचा मातृभूमीकडे ओढा; आप्तांच्या आठवणीने सारेच व्याकूळ

Let us go Saab ... Children, parents are watching our path ..! | परप्रांतियांचा टाहो; हमे जाने दो साब... बच्चे, माँ-बाप हमारी राह देख रहे है़..!

परप्रांतियांचा टाहो; हमे जाने दो साब... बच्चे, माँ-बाप हमारी राह देख रहे है़..!

googlenewsNext
ठळक मुद्दे- पुण्यात कुटुंबासोबत राहून दहावीचे शिक्षण घेत आई-वडिलांना हातभार लावणारा प्रवीण राठोड हा प्रसारमाध्यमांपुढे येताच त्याचे डोळे डबडबलेमोडनिंब येथील निवारा केंद्रात अडकलेल्या परप्रांतीयांच्या आहारासाठी सरपंच दत्तात्रय सुर्वे आणि त्यांचे शिष्टमंडळ कामाला लागले

मारुती वाघ 

मोडनिंब : कुछ भी करो़़़ हम अपने घर जाना चाहते है... हम और कितने दिन तक यहा रुकानेवाले... कब खुलेगा यहां का लॉकडाउऩ़़ हमारे बच्चे, माँ-बाप हमारी राह देख रहे है़...हमे जाने दो’ असा आर्त टाहो फोडताहेत मोडनिंब येथील शेल्टर होममधील परप्रांतीय.

९ एप्रिल रोजी अलिबाग, पुणे, मुंबई या भागातील अनेक नागरिक कोरोनाच्या भीतीने ‘नको ते पुणे़़़ आपल्याला नको ती मुंबई़़़ आपला गावच बरा’ म्हणत गावचा रस्ता धरला़ परराज्यातील जवळपास ७५ नागरिक पायी चालत तेलंगणाकडे निघाले होत़े  यांच्यापैकी काही जण दुचाकीवरून निघाले़ यांच्यापैकी काही जणांनी आपलं गाव गाठलं़ पायी प्रवास करत निघालेले पोलिसांच्या तावडीत सापडले.

दरम्यान, पोलिसांनी मोडनिंब येथे सुरू केलेल्या शेल्टर होममध्ये आणून दाखल केले़ आज १३ दिवसांनंतरही हे लोक उमा विद्यालयाच्या आवारातच अडकून पडले आहेत़ मोडनिंब ग्रामपंचायतीने या सर्वांना राहण्याची, दोन वेळच्या जेवण्याची आणि चहा-नाष्टा आणि अरोग्याची सुविधा दिली आहे. येथे सोयीसुविधा असल्यातरी या लोकांचे येथे कशातच मन लागत नाही़ साºयांची ओढ आपल्या गावाकडील कुटुंबाकडे लागून राहिली आहे़

सरपंचांच्या शिष्टमंडळाची धावपळ 
- मोडनिंब येथील निवारा केंद्रात अडकलेल्या परप्रांतीयांच्या आहारासाठी सरपंच दत्तात्रय सुर्वे आणि त्यांचे शिष्टमंडळ कामाला लागले आहे़ सकाळी नाष्टा, दोन वेळा चहा, आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या़ त्यांचे सर्व स्वयंसेवक दररोज या लोकांची सेवा करीत आहेत़

अन् प्रवीणचे डोळे डबडबले
- पुण्यात कुटुंबासोबत राहून दहावीचे शिक्षण घेत आई-वडिलांना हातभार लावणारा प्रवीण राठोड हा प्रसारमाध्यमांपुढे येताच त्याचे डोळे डबडबले़ तो म्हणाला, पुण्यात आई-वडील दिवसभर बिगारी काम करतात़ त्यांच्या हाताखाली काम करत दहावीचे शिक्षण घेतोय़ माझे पुढील शिक्षण चालू आहे़ एसटी बस बंद झाल्यामुळे आम्ही सारे जण दुचाकीवरून तेलंगणाकडे निघालो होतो़ आई-वडील एका मोटरसायकलवर होते अन् मी माझ्या काकासोबत मोटरसायकलवर बसून निघालो होतो़ आई-वडील पुढे गेले अन् मी व काका पोलिसांच्या हाती लागलो़ मला सोडा.. माझ्या आई-वडिलांना भेटायला जाऊ द्या म्हणत त्याने टाहो फोडला.

निखळलेला हात घेऊन बसवा अडकला शेल्टर हाऊसमध्ये 
- पुण्यामध्ये एका कंपनीत वॉचमनचे काम करणारा बसवा पुजारी याचा डावा हात काही दिवसांपूर्वी निखळला़ यामुळे वॉचमनचे काम करणारा बसवा ही जखम घेऊन गुजराण करत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि लॉकडाउन झाला़ उपाशीपोटी राहण्यापेक्षा अशी जखम घेऊन एका हाताने साºया जबाबदाºया पार पाडणाºया बसवांना परतीच्या प्रवासात मोडनिंब येथे पोलिसांनी रोखले़

Web Title: Let us go Saab ... Children, parents are watching our path ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.