पुन्हा पंढरीत भक्तिसागर भरू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:26+5:302021-07-21T04:16:26+5:30

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण ...

Let the white ocean of devotion fill up again | पुन्हा पंढरीत भक्तिसागर भरू दे

पुन्हा पंढरीत भक्तिसागर भरू दे

Next

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, प्रांत अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम उपस्थित होते.

पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य मिळू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक अंतर मिटू दे, वारकऱ्यांनी तुडुंब, आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पाहावयाचे आहे.

मंदिरात मुख्यमंत्री ठाकरे यांनी कान्होपात्राच्या वृक्षाचे वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून, याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मानाचे वारकरी वीणेकरी केशव शिवदास कोलते, जि. वर्धा (वय ७१) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, तर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते इंदुबाई केशव कोलते (वय ६६) यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते कोलते यांना सुपूर्द करण्यात आला. त्याचबरोबर पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा यात्रा अनुदानाचा पाच कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

आषाढीच्या निमित्ताने रथाची मिरवणूक

आषाढी यात्रेच्या निमित्ताने मंगळवारी विठ्ठल रथाची प्रदक्षिणा मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी परंपरेने हा रथोत्सव सुरू करण्यात आला. मात्र, यंदा देखील कोरोनामुळे मोठ्या लाकडी रथाऐवजी ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमधून विठ्ठल, राहि आणि रुक्मिणीच्या मूर्ती ठेवून रथयात्रा काढण्यात आली.

----

फोटो : आषाढी एकादशीची शासकीय महापूजा झाल्यानंतर मानाच्या वारकऱ्यांबरोबर विठ्ठलाचे दर्शन घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे.

फोटो ओळी : पंढरपूर : येथील माहेश्वरी धर्मशाळेपासून रथाऐवजी यावर्षी देखील ट्रॅक्टरमध्ये विठ्ठल, राहि आणि रखुमाईच्या मूर्ती ठेवून नगरप्रदक्षिणा मार्गावरून ही रथयात्रा काढण्यात आली.

Web Title: Let the white ocean of devotion fill up again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.