यंत्रमागधारकांच्या अडचणी मांडणार
By admin | Published: July 20, 2014 12:45 AM2014-07-20T00:45:02+5:302014-07-20T00:45:02+5:30
शरद बनसोडे : वस्त्रोद्योग मंत्र्यांना भेटणार
सोलापूर : यंत्रमागधारकांच्या अडचणी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांपुढे मांडण्यात येतील. यासाठी येत्या पंधरा दिवसात सोलापूरच्या शिष्टमंडळासमवेत आपण मंत्र्यांची भेट घेणार आहोत, असे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी सांगितले.
बनसोडे यांनी आज हातमाग, यंत्रमाग, सूत व्यापारी आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी सत्यराम मॅकल, तिलोकचंद शहा, अंबादास बिंगी, मल्लिकार्जुन मारता, सदानंद कोडम, जगदीशप्रसाद खंडेलवाल, मल्लिकार्जुन कमटम, बाळू घनात आदी उपस्थित होते. यंत्रमागधारक संघाच्या वतीने पेंटप्पा गड्डम यांनी बनसोडे यांचा सत्कार केला. यावेळी कारखानदारांनी शासन दरबारी अडचणी सोडविल्या जात नसल्याचे गाऱ्हाणे मांडले. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यातच करप्रणालीही जाचक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावर बनसोडे यांनी यंत्रमागधारकांना शिष्टमंडळ गठीत करण्याची सूचना केली. मंत्र्यांकडून प्रश्न सुटले नाहीत तर पंतप्रधान मोदी यांना भेटू, अशी ग्वाही त्यांनी दिली.