स्मार्टफोनसोबत आपणही स्मार्ट व्हावं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:15 PM2020-01-24T13:15:50+5:302020-01-24T13:16:16+5:30

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते आहे.

Let's be smart with a smartphone ..! | स्मार्टफोनसोबत आपणही स्मार्ट व्हावं..!

स्मार्टफोनसोबत आपणही स्मार्ट व्हावं..!

Next

विसावं शतक सुरू झालंय. टष्ट्वेंटी टष्ट्वेंटीची धूम मनात नवीन आशा, उमेद घेऊन नववर्षाचे स्वागत केले. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते आहे. आपला भारत देशही आज प्रगतीचे अनेक टप्पे पार पाडत यशाची शिखरे पादांक्रांत करतो आहे. डिजिटल इंडिया यामध्ये आपली मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. अशाच प्रगतीमध्ये स्मार्टफोनने आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्मार्टफोनला महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे. खरं तर आदानप्रदान, संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम मानले जाते. पण वाजवीपेक्षा जास्त वापर व दुरुपयोगच होऊन आजची पिढी बिघडतेय व स्त्रियांची मानहानी होतेय, सामाजिक बांधिलकी नाहीशी होते आहे. खूप छान वाटणाºया स्मार्टफोनमुळे वैवाहिक जीवनात सौख्य नाही, घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे.

सद्यस्थितीला सखीसहेलींना तर हा फोन म्हणजे कटकट वाटते आहे. सांगावे की नको, फोन तर लागतोच, मग नेट नको, पण रेटच असे आहेत की जे आताच्या कंपन्या नेट पॅकसहितच देतात. आपोआप आपण मग सोशल मीडियाकडे वळतो. मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सामाजिक, निसर्ग असे एक ना अनेक ग्रुप होतात. सुरुवातीला छान माहिती,उपयुक्त मार्गदर्शन मिळत जाते. आपणही गुंतत जातो. मग सुंदर डीपी ठेवले जातात, फोटो शेअर केले जातात.

आपल्या सर्वांचे हेतू छान असताना आपले कौतुक केले जाते. कोणीतरी मैत्री वाढवून तू छान दिसतेस. तू मला फार आवडते, मी फोन करू का? तू वयाने लहानच दिसते. खरंच मी मनापासून बोलत आहे. रागाला नको जाऊस. असे संवाद पोस्ट येतात. नंतर फोन कॉल.. येथे तर तू खूप गोड बोलतेस. आवाज मस्तच आहे. तू बोलत रहावं व मी ऐकत रहावं तासंतास असं वाटतं. रोनो, पिल्लू, सोनू.. अशी गोंडस नावं देऊन घोळवत ठेवून जवळीक वाढवतात. भेटवस्तू पाठवतात. अचानक एक दिवस मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, आपण भेटूयात असा आग्रह होतो. शेवटी आपण आपली शिकार होतो..

सखींनो असे अनेक अनुभव असतात. तुम्ही यातून जात असता, असे संवाद इतरांनाही सांगू शकत नाही. भांडण करून, दम देऊन, ब्लॉक करून नाही चालणार. कारण या व्यक्ती स्वत:स सेफ (सुरक्षित) ठेवत असतात. स्वत:च्या घरापर्यंत जाणवू देत नाहीत. मैत्री म्हणून घरी बोलवत नाहीत. आपण एक उच्च व्यक्तिमत्त्व बनून टेंभा मिरवत इतरांना असे त्रास देत, उलट वर स्त्री स्वातंत्र्याच्या चर्चा, लेखनही करतील. नाहक त्रास स्त्रीस होतो. तिची अहवेलना केली जाते. ‘ती’ तशीच अशी एक मानसिकता तयार केली जाते.
तर मैत्रिणींनो जरा लक्ष द्या, असे त्रासदायक मेसेज आले तर पहिल्यांदा गोडीगुलाबीने सांगा, समजवा, नाही समजले तर नावासहित त्या मेसेजचे स्क्रीन शाॉट काढून व्हायरल करा.

समाजात जाणीव झाली की, सजगता वाढेल व आळा बसेल. भीतीमुक्त निर्णय घ्यायचा व आपण आत्मविश्वासाने चालत या घाणेरड्या विचार प्रवृत्तीला थोपवणे गरजेचे आहे. आपण हे ठामपणे सांगणे गरजेचे आहे. आपणच स्मार्टफोन नीट शिकून घेतला पाहिजे. नवनवीन अ‍ॅपची माहिती घ्यावी. घरबसल्या हातातील मोबाईलचा व्यवसायात वापर केला जातो, हे समजून घेतले पाहिजे. तसेच निर्भया, महिला सक्षमीकरण, सुरक्षा यांचीही माहिती, फोन नंबर सेव्ह करून ठेवावे. जेव्हा आपण स्मार्ट बनू तेव्हा पुढचा कुमकवत बनतो. विनाविषय संवाद टाळा. तुमची माहिती देऊ नका. माणसाला माणूस समजणं कठीण आहे. दक्षता हाच उपाय आहे
- विद्या भोसले
(लेखिका पर्यावरण व सामाजिक कार्यकर्त्या आहेत.) 

Web Title: Let's be smart with a smartphone ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.