कोरोनाचे नियम पाळूया...शिवजयंती साजरी करुया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:39 AM2021-02-18T04:39:34+5:302021-02-18T04:39:34+5:30

- अतुल पाडे बार्शी -- या सरकारला लग्न समारंभ, लोकल रेल्वे आणि राजकीय कार्यक्रमाला गर्दी चालते. प्रशासकीय बैठका होतात. ...

Let's follow the rules of corona ... let's celebrate Shiva Jayanti | कोरोनाचे नियम पाळूया...शिवजयंती साजरी करुया

कोरोनाचे नियम पाळूया...शिवजयंती साजरी करुया

Next

- अतुल पाडे

बार्शी

--

या सरकारला लग्न समारंभ, लोकल रेल्वे आणि राजकीय कार्यक्रमाला गर्दी चालते. प्रशासकीय बैठका होतात. मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील अठरा पगड जातींच्या शिवजयंती सोहळ्याला असे निर्बंध लावणे योग्य नाही. कोरोनाचे नियम पाळून शिवजयंती साजरी करण्यास परवानगी द्यायला पाहिजे होती.

- महावीर कदम

अध्यक्ष, भाजप बार्शी शहर

-----

कोरोणाचे संकट गेली दहा महिन्यापासून देशासह महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करुया. जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करुया. कोरोनाबाबत उपाययोजना करूनच शिवजयंती साजरी करुया.

- संतोष गायकवाड

जिल्हा समन्वयक सकल मराठा समाज, मोहोळ

---

कोरोणा'चा पुन्हा जोर वाढत असल्याने नियम व अटी पाळण्याच्या सूचना आहेत. आयोग्य विषयक, रक्तदान शिबीर घेण्याचे नियोजन आहे. अतिशय साध्या पद्धतीने छत्रपती शिवजन्मोत्सव साजरा करुया. मिरवणुकीला परवानगी नाही हे योग्यच.

- गणेश पाटील, कोंडी, ता. उत्तर सोलापूर

----

गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होतोय हे खरे असले तरी सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्स ठेवून शिवजयंती साजरी करायला परवानगी देणे आवश्यक होते. याउलट प्रशासनाने सर्वसामान्यांना विश्वासात न घेता कायद्याचा धाक दाखविला आहे. हे चुकीचे असून नियम पाळून शिवजयंती साजरी हाव्ही.

- प्रा. मीनाक्षी जगदाळे

जिल्हा कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, माळशिरस

---

सत्ताधारी राजकीय पक्षाने गर्दी जमवून राजकीय मेळावे घेतलेले चालतात. विरोधी पक्षानेही गर्दी जमवून मोठमोठी आंदोलने केलेली चालतात. मात्र शिवजयंती साजरी करायला कोरोनाचा अडसर येतो. पोलिसी खाक्‍या दाखविला जातो, गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवली जातेय, हे उचित नाही.

- धनंजय माने-साखळकर

समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चा, माळशिरस

Web Title: Let's follow the rules of corona ... let's celebrate Shiva Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.