साखर उद्योगावर लवकर तोडगा काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:34+5:302021-03-21T04:21:34+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी ते महाराष्ट्रातील ...

Let's get an early settlement on the sugar industry | साखर उद्योगावर लवकर तोडगा काढू

साखर उद्योगावर लवकर तोडगा काढू

Next

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी ते महाराष्ट्रातील शिष्टमंडळाशी बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी महाराष्ट्रातल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांचा सत्कार केला.

यावेळी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. छत्रपती शिवाजीराजे भोसले, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राहुल कुल, माजी आ. पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परस्थिती, कायदा-सुव्यवस्था, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात हे सरकार कसे अपयशी ठरले, यासह विविध विषयांवर चर्चा केली.

फोटो ओळ ::::::::::::::::::::

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सत्कार करताना खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. छत्रपती शिवाजीराजे भोसले, राधाकृष्ण विखे-पाटील, पंकजा मुंडे, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील आदी.

Web Title: Let's get an early settlement on the sugar industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.