केळीच्या निर्यातवाढीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:33+5:302021-02-06T04:39:33+5:30
कंदर आणि परिसरातील गावांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कंदर येथे केडी एक्स्पोटर्स कंपनीच्या ...
कंदर आणि परिसरातील गावांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कंदर येथे केडी एक्स्पोटर्स कंपनीच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुका कृषी अधिकारी गणेश दुरंदे, केळी उद्योजक किरण डोके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, कंदरच्या केळीचा ब्रँड विकसित झाला आहे. तो अधिकचा प्रसिद्ध होण्यासाठी तसेच उत्पादकता वाढावी, उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांना एकत्रित करून आराखडा तयार केला जाईल. यावेळी विविध शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.
कंदर ग्रामपंचायत येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जमीन सुपीकता निर्देशांक फलक प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी गणेश दुरंदे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, सरपंच भास्कर भांगे, तलाठी ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
----
शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या
कंदर येथे खत, पाणी, माती तपासणी कार्यशाळा व्हावी, कंदर आणि परिसरासाठी स्वतंत्र फीडर असावा, दिवसा आठ तास वीज पुरवठा असावा. उजनी धरणामुळे पुनर्वसित झालेल्या गावांचा विकास व्हावा, रस्ते विकास व्हावा, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे उपकेंद्र करमाळा तालुक्यात व्हावे, अशा मागण्या मांडल्या. जमीन बिगरशेती करताना विविध अडचणी येतात, कृषी सहायक मुक्कामी राहत नाहीत, या तक्रारीवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
----
फोटो ०४करमाळा-कलेक्टर व्हिजीट
कंदर (ता.करमाळा) येथील केळीच्या प्रक्षेत्रास भेट देऊन माहिती घेताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा कृषी अधीक्षक माने आदी.