चिठ्ठीने गावकारभाऱ्यांची धडकन वाढवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:55+5:302021-02-06T04:39:55+5:30
गावगाड्यातील निवडणुकांमध्ये वेगळा माहाैल पाहायला मिळतो. यात अनेक बैठकांमध्ये निर्णय घेताना गावकारभाऱ्यांची दमछाक पाहायला मिळत होती. अशावेळी गावकारभाऱ्यांनी चिठ्ठीचा ...
गावगाड्यातील निवडणुकांमध्ये वेगळा माहाैल पाहायला मिळतो. यात अनेक बैठकांमध्ये निर्णय घेताना गावकारभाऱ्यांची दमछाक पाहायला मिळत होती. अशावेळी गावकारभाऱ्यांनी चिठ्ठीचा कौल घेतला. पुढे प्रशासकीय यंत्रणेनेही काही मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी चिठ्ठीचाच आधार घेतला. मात्र, या चिठ्ठीने गावकारभाऱ्याचे मनसुबे उधळले. सत्तेची गणिते चुकली. आरक्षण सोडतीमुळे सरपंचपदाची खुर्ची चिठ्ठीच्या इशाऱ्यावर नाचताना दिसली.
चिठ्ठीचा कौल
बिजवडी ग्रामपंचायतीत दोन्ही गटांचे समान सदस्य निवडून आले. उर्वरित एका जागेसाठीही दोन्ही उमेदवाराला समान मते पडली. मात्र, चिठ्ठीने सत्ताधारी गटाची सत्ता तारली. मांडव्याच्या गावगाड्यात याच चिठ्ठीने सत्ताधारी गटाची सत्ता हिरावली. भांबमध्ये दोन महिला सदस्यांच्या लढतीत चिठ्ठीचा आधार घ्यावा लागला. आरक्षण सोडतीतसुद्ध अनेक गावकारभाऱ्यांचा अंदाज चिठ्ठीने चुकीचा ठरवला. केवळ चिठ्ठीमुळेच सरपंचपदाची लॉटरी काहींना लागणार, तर काहींची हुकणार आहे. एकूणच चिठ्ठीचा कौल या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला आहे.