ऊस उत्पादकांचे शोषण थांबविण्याचे पत्र व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:15+5:302021-01-03T04:23:15+5:30
ऊस शेती सध्या अनेक संकटांशी सामना करीत आहे. यातच पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागाने ...
ऊस शेती सध्या अनेक संकटांशी सामना करीत आहे. यातच पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागाने दखल घेत याबाबत मजुरांकडून शेतकऱ्यांचे शोषण होणार नाही. याबाबत उचित उपायोजना करून त्याचा अहवाल तत्काळ या कार्यालयास सादर करावा. तसेच वर नमूदप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात शोषण होते किंवा नाही याबाबत अहवाल सादर करावा. अशा आशयाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या सहीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
असे होते शोषण
ऊसतोड चिठ्ठी आल्यानंतर शेतकऱ्याकडून पैसे घेतले जातात. कोयता पूजेची दक्षिणा म्हणून वेगळी रक्कम घेतली जाते. सरपण (इंधन) व शिधा घेतला जातो. ऊसतोडणी अर्ध्यावर आल्यास मेजवानी घेणे, शेतकऱ्यांच्या शेतात असलेली फळे, भाजीपाला इच्छेविरुद्ध घेतला जातो, उसाचे वाडे शेतकऱ्याला न देता विक्री करणे, वाहनचालकाला प्रत्येक खेपेला वेगळी रक्कम द्यावी लागते, दोन्ही वेळेचा जेवणाचा डबा पोहोच करावा लागतो. अशा वेगवेगळ्या बाबींद्वारे शेतकऱ्यांचे शोषण होत असल्याची तक्रार शासनाकडे करण्यात आली आहे.
कोट ::::::::::::::::::::
ऊस उत्पादकांवर होणाऱ्या अन्यायाची सहनशीलता बघितली जात आहे. सध्या व्हायरल पत्राप्रमाणे साखर कारखान्यांनी याबाबतीत लक्ष देणे आवश्यक आहे. आम्ही पत्रव्यवहार करणार असून, या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन उभारावे लागणार आहे.
- अजित बोरकर
तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना