निवासी शाळेच्या वर्गखोल्यांवरील पत्रे उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:02+5:302021-06-04T04:18:02+5:30
सांगोला-अकलूज रोडवर प.पू. भय्युजी महाराजप्रणीत भारतीय संस्कृती ज्ञानमंदिर इ. १ ली ते १० वीपर्यंत निवासी आश्रमशाळा आहे. कोरोना महामारीमुळे ...
सांगोला-अकलूज रोडवर प.पू. भय्युजी महाराजप्रणीत भारतीय संस्कृती ज्ञानमंदिर इ. १ ली ते १० वीपर्यंत निवासी आश्रमशाळा आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षांपासून निवासी शाळा बंदच आहे. सध्या अधीक्षक विलास सोळंके, लिपिक विकास चव्हाण, शिपाई अमोल लहाने, मुख्याध्यापक हेच शाळेचे सुट्टीतील दैनंदिन कामकाज पाहतात.
२ जून रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे वाहू लागले. या वादळी वाऱ्यात भारतीय संस्कृती ज्ञानमंदिरच्या ८ वर्गखोल्यांवरील पत्रे, अँगल उडून सुमारे २०० फूट अंतरावर फेकले गेले. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसात वर्गखोल्यांतील बेंचेस, १६ सीसीटीव्ही कॅमेरे, शालेय साहित्य, विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके, अंथरुण-पांघरुणासह ३ संगणक संच, ३ टीव्ही संच, १ कुलर, १ वॉशिंग मशीन, पाण्याच्या टाक्या, स्पीकर साहित्य, डायस, बांधकामाची पडझड झाली आहे.
नुकसानीचा केला पंचनामा
या घटनेची माहिती मिळताच भारतीय संस्कृती ज्ञान मंदिरचे उपाध्यक्ष डॉ. पीयूष सांळुखे-पाटील यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. एखतपूरचे तलाठी हरिचंद्र जाधव यांनी पंचनामा केला. या घटनेत शाळेच्या वर्गखोल्यांवरील पत्रे, अँगलसह बांधकामाची पडझड, सर्व साहित्य मिळून सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.
फोटो ओळ :::::::::::::::::
वादळी वारे व अवकाळी पावसात भारतीय संस्कृती ज्ञानमंदिर निवासी शाळेवरील पत्रे उडाल्याचे छायाचित्र.