टेंभुर्णी येथील दोन बियाणे विक्री दुकानांचा परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:47+5:302021-09-25T04:22:47+5:30

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एस.एन.बारवकर व माढा तालुका कृषी अधिकारी बी.डी. कदम यांनी ...

License of two seed shops at Tembhurni revoked | टेंभुर्णी येथील दोन बियाणे विक्री दुकानांचा परवाना रद्द

टेंभुर्णी येथील दोन बियाणे विक्री दुकानांचा परवाना रद्द

Next

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एस.एन.बारवकर व माढा तालुका कृषी अधिकारी बी.डी. कदम यांनी २३ सप्टेंबर रोजी वरील कृषी भांडाराची तपासणी केली होती. यावेळी बियाणे साठा व भावफलक ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी न लावणे, विक्रीस ठेवलेल्या सर्व बियाणांची देयके न ठेवणे, बियाणे साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, बियाणे खरेदीदारास खरेदी बिल दिले नाही, विक्री बिलात बियाणांचा संपूर्ण तपशील दिला जात नाही, ग्राहकास दिल्या जाणाऱ्या खरेदी पावतीवर स्वतःची सही व ग्राहकांची सही घेतली जात नाही, बियाणे जादा दराने विक्रीच्या उद्देशाने बियाणे खरेदीदारास अधिकृत विक्री पावती न देणे, साठा फलक व भाव फलकावर बियाणे साठा व दर न दर्शवणे आधी त्रुटी आढळून आल्या होत्या.

..................

सुनावणीनंतर घेतला निर्णय

दोन्ही दुकानदारांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे यांच्या कार्यालयात सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. सुनावणीच्या वेळी दुकानदार यांनी दिलेले स्पष्टीकरण व दुकान तपासणी अहवाल यांचा एकत्रित विचार करून बियाणे नियंत्रण आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याने दोन्ही बियाणे विक्री दुकानांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

Web Title: License of two seed shops at Tembhurni revoked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.