राज्यातील ६० डिस्टिलरी अन् ७० औषध कंपन्यांना सॅनिटायझर तयार करण्याचे परवाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:46 AM2020-04-02T11:46:21+5:302020-04-02T11:49:41+5:30
कोरोनावर मात करण्यासाठी शासनाचे प्रयत्न, पुणे विभागात ३१ प्रस्तावांना मंजुरी
सोलापूर : संपूर्ण देश दहशतीखाली असलेल्या कोरोना या विषाणूमुळे पसरणाºया साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखाने व मद्य तयार करणारे खासगी प्रकल्प हँड सॅनिटायझर तयार करण्यासाठी पुढे आले आहेत. एकट्या पुणे विभागात ३१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभरात ६० डिस्टिलरी व ७० औषधी कंपन्यांना सॅनिटायझर तयार करण्याचे परवाने राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने मंजूर केले आहेत.
संपूर्ण जगभरात सध्या कोरोनाची भीती आहे. यासाठी दक्षता म्हणून हात स्वच्छ धुण्यास सांगितले जाते. यासाठी सॅनिटायझर वापरणे योग्य असल्याचे सांगितले जाते; मात्र सध्या सॅनिटायझर सहज व गरिबांना परवडेल अशा दरात मिळत नाही. यामुळेच राज्यातील साखर कारखाने, औषधी कंपन्या व विदेशी मद्य (दारू) तयार करणारे प्रकल्प सॅनिटायझर तयार करण्यासाठी पुढे आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत राज्य अन्न औषध प्रशासन आयुक्त मंजुरी दिली जात आहे. ज्या कारखान्यांकडे डिस्टिलरी ( आसवनी) प्रकल्प आहे अशांनाच सॅनिटायझर तयार करण्याचा परवाना मिळणार आहे. आलेल्या अर्जांपैकी कर्मयोगी अंकुशराव टोपे साखर कारखाना, जालना, वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना, सांगली, माळेगाव साखर कारखाना, पुणे व अजिंक्यतारा साखर कारखाना, सातारा, पांडुरंग कारखाना, श्रीपूर, श्री विठ्ठलराव शिंदे कारखाना, यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना, सातारा, लोकनेते सुंदरराव सोळुंके , बीड, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा लातूर, विलास साखर कारखाना, लातूर, श्री सोमेश्वर कारखाना, पुणे, विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, लोकमंगल अॅग्रो, बीबीदारफळ, फॅबटेक शुगर, नंदूर मंगळवेढा, जकराया शुगर, वटवटे, मोहोळ, युटोपियन शुगर, कचरेवाडी, मंगळवेढा, या कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. याशिवाय ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टिलरी, श्रीपूर, विष्णू लक्ष्मी ग्रेप डिस्टिलरी अक्कलकोट रोड, सोलापूर व खंडोबा डिस्टिलरी, टेंभुर्णी या विदेशी मद्य तयार करणाºया प्रकल्पांनाही हँड सॅनिटायझर तयार करण्यासाठी परवाने मिळाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच ३१ प्रस्ताव मंजूर केले आहेत.
जिल्ह्यातील सात कारखान्यांचा समावेश
- राज्यात साखर कारखानदारीत अव्वल असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ७ साखर कारखान्यांनी तसेच मद्य तयार करणाºया तीन अशा १० कारखान्यांतून सॅनिटायझर तयार होणार आहे. या सर्व प्रकल्पांना अन्न औषध प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
औषधे तयार करणाºया विविध ७० खासगी कंपन्या तसेच डिस्टिलरी प्रकल्प असणाºया ६० साखर कारखान्यांना सॅनिटायझर तयार करण्याचे परवाने एका आठवड्यात मंजूर केले. जनआरोग्याचा हेतू समोर ठेवून या मंजुºया दिल्या. आणखीन काही प्रस्ताव मंजूर केले जातील.
- अरुण उन्हाळे
आयुक्त, अन्न व औषध प्रशासन