हलग्या कडाडल्या... फटाके फोडले... पण बैठकीच्या तहकुबीने सारे चिडीचूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:27+5:302021-07-03T04:15:27+5:30

मात्र सावंत यांच्या हरकतीच्या पवित्र्याने माजी आमदार नारायण पाटील गट अलर्ट झाला आहे. पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या ...

Light crackers ... firecrackers exploded ... but all the annoyance of the meeting | हलग्या कडाडल्या... फटाके फोडले... पण बैठकीच्या तहकुबीने सारे चिडीचूप

हलग्या कडाडल्या... फटाके फोडले... पण बैठकीच्या तहकुबीने सारे चिडीचूप

Next

मात्र सावंत यांच्या हरकतीच्या पवित्र्याने माजी आमदार नारायण पाटील गट अलर्ट झाला आहे. पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणूक गुरुवारी तहसीलदार यांनी बोलावली होती. बैठकीची नोटीस आपल्याला सात दिवस अगोदर वेळेत मिळाली नसल्याचे कारण देत अ‍ॅड. राहुल सावंत यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे हरकत घेतल्याने तहसीलदार समीर माने यांनी निवडीची बैठक ऐनवेळी तहकूब केल्याने एकच गोंधळ उडाला.

----

कार्यकर्त्यांची निराशा

निर्विवाद बहुमत असलेल्या नारायण पाटील गटाने सभापती पदासाठी डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांच्या नावाला पसंती देत निवडणूक रिंगणात एकच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे अतुल पाटील सभापती होणार असल्याने पंचायत समिती आवारात एकमेकांना पेढे वाटून हलग्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी, फेटे व हारतुरे घालून जल्लोष सुरू असताना... अचानक बैठक तहकूब झाल्याचे समजल्याने कार्यकर्त्यांतून निराशा व्यक्त करण्यात आली.

----

मी दवाखान्याच्या कामानिमित्ताने बाहेरगावी असल्याने १ जुलैच्या सभेची नोटीस मला २८ जून रोजी मिळाल्याने सभेची तयारी करता आली नाही. आ. संजयमामा शिंदे यांना याबाबत सांगितल्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली व नियमानुसार सभा तहकूब झाली.

- अ‍ॅड. राहुल सावंत, सदस्य, पंचायत समिती.

----

सभापती पदापर्यंत मजल मारता येत नसल्याने आ. शिंदे यांनी पळवाट शोधून स्वत:चे समाधान करून घेतले आहे. बाजार समितीमध्ये सावंतांना पुढे करून जगतापांना मागे खेचण्याचा डाव यशस्वी झाला. आता पंचायत समितीमध्ये असेच काही तरी घडवण्याचा शिंदेंचा डाव आहे. हे राजकारण सावंत गटाने ओळखले पाहिजे. आमच्याकडे बहुमत असल्याने सभापती आमचाच होणार आहे.

- अतुल पाटील, सदस्य, पंचायत समिती.

----

सभापती निवडीच्या सभेची नोटीस प्रत्येक सदस्यास सात दिवसांपूर्वीच दिली होती. अ‍ॅड. सावंत यांना वेळेत नोटीस न मिळाल्याने त्यांच्या नावाची नोटीस त्यांच्या पत्त्यावर चिकटवण्यात आली होती. पण त्याचा पंचनामा केला नव्हता. त्यामुळे ते ग्राह्य धरता आले नाही. सावंत यांच्या तक्रारीवरून सभा तहकूब करून आता ही सभा ९ जुलै रोजी बोलावली आहे.

- समीर माने, तहसीलदार, करमाळा.

Web Title: Light crackers ... firecrackers exploded ... but all the annoyance of the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.