उजनीतून पुन्हा भीमेत पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:47 AM2019-08-19T10:47:39+5:302019-08-19T10:49:34+5:30

पुणे परिसरात पाऊस; ११,६०० क्युसेकचा विसर्ग

The light left the water in fear again | उजनीतून पुन्हा भीमेत पाणी सोडले

उजनीतून पुन्हा भीमेत पाणी सोडले

googlenewsNext
ठळक मुद्देउजनी धरणात पाणी वाढल्याने भीमेत पुन्हा विसर्ग सोडण्यात आलाजादा होणारे पाणी वाया घालविण्याऐवजी कालव्याद्वारे जास्तीतजास्त पाणी अवर्षण क्षेत्राला देण्यासाठी प्रयत्नदुष्काळी भागासाठी जादा पाणी देण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे

सोलापूर : उजनी धरणात पाणी वाढू लागल्याने पुन्हा रविवारी भीमेत ११ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. 

पुणे परिसरात शनिवारी पावसाने हजेरी लावली. यामुळे दौंड येथून १२ हजार ३५१ तर बंडगार्डनहून ९ हजार ७६0 क्युसेकचा विसर्ग धरणात येत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता धरणातील पाणी पातळी ४९७.२८0 मीटरवर गेली. धरणात १२२. ६६ टीएमसी पाणीसाठा झाल्याने सकाळपासून २९00 क्युसेक पाणी भीमेत सोडण्यात आले. त्याचबरोबर वीजनिर्मितीसाठी १६०० असा ४५०० क्युसेकचा प्रवाह भीमेत सुरू झाला. त्याचबरोबर मुख्य कालव्याला ३१५0, बोगद्यातून १२00 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता भाटघर येथून ९१0, नीरादेवधर येथून ७५0 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. 

वीरधरणातून नीरेत ४८८७ क्युसेकचा प्रवाह कायम आहे. दुपारी बारा वाजता उजनीतून डिचार्ज ५१00 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. सायंकाळी पाच वाजता मात्र डिचार्ज दहा हजारांवर नेण्यात आला आहे. वीजनिर्मितीसह उजनी धरणातून भीमेत ११ हजार ६00 क्युसेकचा विसर्ग येत आहे. 

अवर्षणग्रस्त क्षेत्राला पाणी द्यावे !
- उजनी धरणात पाणी वाढल्याने भीमेत पुन्हा विसर्ग सोडण्यात आला आहे. जादा होणारे पाणी वाया घालविण्याऐवजी कालव्याद्वारे जास्तीतजास्त पाणी अवर्षण क्षेत्राला देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी होत आहे. कालव्यातून सोडलेले पाणी टेल एंडला अद्याप पोहोचलेले नाही. सुरुवातीचे शेतकरी पाणी घेत असल्याने पाण्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे कित्येक शाखांतून अजून पाणी गेलेले नाही. त्यामुळे वरच्या भागाला पाणी जादा देण्यात येत आहे. अशात पाणी बंद केल्यास टेल एंडच्या शेतकºयांना पाणी मिळणे अवघड होणार आहे. याशिवाय वरच्या भागाला पाणी जादा झाल्यावर कालवे फुटण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे पाणी बंद करावे लागते. दुष्काळी भागासाठी जादा पाणी देण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे. 

Web Title: The light left the water in fear again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.