पावसाच्या हलक्या सरींमुळे रब्बीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:18 AM2021-01-09T04:18:06+5:302021-01-09T04:18:06+5:30
यावर्षी माळशिरस तालुक्यात पावसाने मुक्काम वाढवल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे अपेक्षित उत्पन्न घेता आले नाही; मात्र जमिनीतील पाणीपातळी चांगली असल्यामुळे ...
यावर्षी माळशिरस तालुक्यात पावसाने मुक्काम वाढवल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे अपेक्षित उत्पन्न घेता आले नाही; मात्र जमिनीतील पाणीपातळी चांगली असल्यामुळे रब्बी हंगाम लाभदायी ठरेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती. त्यामुळे गहू, हरभरा, मका या प्रमुख पिकांसह इतर पिकांची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली; मात्र गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल होऊन थंडी कमी झाली व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे फळबागांच्या नुकसानीबरोबरच गहू व हरभरा या पिकांनाही या हवामानाचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
कोट ::::::::::::::::::::
सध्याचे हवामान तांबेरा, करपा, कुजवा, भुरी, डाऊन्यासह विविध रोगांना पोषक ठरू शकते. रब्बी हंगामातील पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी आवश्यक त्यावेळी औषध फवारणी व इतर काळजी घेणे आवश्यक आहे.
- गजानन ननावरे, तालुका कृषी अधिकारी माळशिरस