विद्युत झगमगाटात उजळले सोलापुरातील शहरातील चर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:56 AM2019-12-24T10:56:46+5:302019-12-24T10:59:45+5:30
कॅरल सिंगिंगद्वारे प्रभू येशू जन्माचे गुणगान; केक वाटून साजरा होणार नाताळ : सर्वांच्या घरी प्रार्थना सभा
सोलापूर : नाताळ अर्थात ख्रिसमस उत्सव साजरा करण्यासाठी सोलापुरातील ख्रिस्ती बांधवांकडून सर्वत्र लगबग सुरु आहे़ ख्रिस्ती बांधवांच्या घरी कॅरल सिंगिंग कार्यक्रम उत्साहात सुरु आहेत़ कॅरल सिंगिंगद्वारे बांधव प्रभू येशूंचे गुणगान गात आहेत़ तसेच प्रभूंच्या वचनांची तसेच संदेशाचे गायन घरोघरी सुरु आहे़ नाताळाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील सर्वच चर्चमध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़ सर्वत्र प्रभू येशूंच्या जन्मसोहळ्याची तयारी सुरु आहे़ सर्वत्र नाताळाची धूम आणि उत्साहाचे वातावरण आहे.
२५ डिसेंबर रोजी सकाळी सर्वच चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे़ सर्वत्र गोड केक वाटून ख्रिसमस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती दि फर्स्ट चर्च, सोलापूरचे रेव्ह़ विकास रणसिंगे यांनी ‘लोकमत’ला दिली़ रंगभवन येथील दि फर्स्ट चर्चमध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच रेल्वे लाईन येथील सेंट जोसेफ चर्चमध्ये मंगळवारी रात्री नऊ वाजता प्रभू येशूंचा जन्मसोहळा होणार आहे़ त्याची तयारी सुरु आहे़ सकाळी साडेसात वाजता चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे़ साडेआठ वाजता ख्रिस्ती बांधवांना चर्च फादरद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती चर्चच्या वतीने देण्यात आली आहे.
साकारले ख्रिसमस ट्रीचे चित्र
- चर्चच्या भिंतीवर प्रभू येशू, सांताक्लॉज तसेच ख्रिसमस ट्रीचे रंगीत चित्र साकारले आहे़ रंगभवन येथील एपिफणी चर्च, मोदी येथील मेथडीस्ट चर्च, सात रस्ता येथील हिंदुस्तानी चर्च तसेच रेल्वे लाईन येथील सेंट जोसेफ चर्च तसेच सिलोह चर्च यासह इतर चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्मसोहळ्याची तयारी उत्साहात सुरु आहे़
दि फर्स्ट चर्च सोलापूरच्या वतीने २५ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता रंगभवन येथील चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना सभा नियोजित आहे़ तसेच साडेदहा वाजता नाताळ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे़ दुपारी साडेबारादरम्यान रॅली सुरु राहील़ रंगभवन येथून रॅली सात रस्ता परिसरात फिरणार आहे़ त्यानंतर पुन्हा रंगभवन येथील दि फर्स्ट चर्च येथे रॅलीचा समारोप होणार आहे़ या रॅलीत प्रभू येशंूचा मेसेज तसेच विश्व शांतता धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यात येणार आहे़ दिवसभर चर्चमध्ये गीतगायन कार्यक्रम सुरु राहील़ चर्चमध्ये येणाºया बांधवांना केक वाटले जाणार आहे़ ९ जानेवारीपर्यंत चर्चमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम नियोजित आहेत़
- रेव्ह़ विकास रणसिंगे, दि फर्स्ट चर्च, सोलापूर