मोडनिंबचा जनावरांचा बाजार उद्यापासून फुलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:25 AM2021-08-27T04:25:49+5:302021-08-27T04:25:49+5:30
मार्च महिन्यापासून जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान शेतकऱ्यांची अनेक व्यापारी व दलालांनी फसवणूक केली आहे. त्यांच्या जनावरांना ...
मार्च महिन्यापासून जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान शेतकऱ्यांची अनेक व्यापारी व दलालांनी फसवणूक केली आहे. त्यांच्या जनावरांना खरेदी किंवा विक्री करताना योग्य किंमत दिली गेली नाही. पशुपालकांची फसवणूक टाळण्यासाठी जनावरांचा बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे जामगावकर यांनी सांगितले. कुर्डूवाडी बाजार समितीच्या मुख्य यार्डात सध्या भाजीमंडईचे दररोज लिलाव केले जातात. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाचे सर्व निकष पाळूनच व्यवहार केले जात आहेत. शेतकरी, कर्मचारी व व्यापाऱ्यांची नगरपरिषद आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणीही केली जात आहे. भाजी मंडई यार्डात कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारीही दररोज दुपारी स्वच्छता अभियान राबवत असल्याचे पाटील जामगावकर यांनी सांगितले.