केरळ पूरग्रस्तांसाठी सोलापूरातील मुस्लिम बांधवांनी मागितली दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:31 PM2018-08-22T12:31:59+5:302018-08-22T12:35:50+5:30

सोलापूरात ठिकाणी नमाज : शहीद झालेल्या जवानांना वाहिली श्रद्धांजली

Link requested by Muslim brothers from Solapur to Kerala flood victims | केरळ पूरग्रस्तांसाठी सोलापूरातील मुस्लिम बांधवांनी मागितली दुवा

केरळ पूरग्रस्तांसाठी सोलापूरातील मुस्लिम बांधवांनी मागितली दुवा

Next
ठळक मुद्देसीमेवर शहीद झालेल्या जवानांसाठी श्रद्धांजली अर्पण केलीपूरग्रस्तांना मुस्लिम बांधवांनी सढळ हाताने मदत करावी असेही आवाहन केले. शहर वाहतूक पोलिसांनी मार्गावर बंदोबस्त ठेवला होता

सोलापूर : ‘ए अल्लाह हम नासमज इन्सान है, हम गुन्हेगार है, खतावर है,  हमसे कही गलती हो गई है तो माफ कर, हमने जान बूझकर गलतीयाँ नही की है, गलतीयो पे दर गुजर फर्मा, हमसे कहर मत बरसा, आनेवाली बलाओंसे हमे बचा’, अशा शब्दात शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी आज येथे केरळ पूरग्रस्तांसाठी दुवा मागितली.

बकरी ईदनिमित्त होटगीरोडवरील ईदगाह मैदानावर पवित्र इदुल अजहा म्हणजेच बकरी ईदची सामुहिक नमाज पार पडली. यावेळी परिसरातील शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाज पठणानंतर शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांचे प्रवचन झाले. यावेळी त्यांनी देशातील सर्वधर्मियांच्या रक्षणासाठी सीमेवर शहीद झालेल्या जवानांसाठी श्रद्धांजली अर्पण केली. 

जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करणाºया जवानांसाठी काझी यांनी दुवा मागितली. केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीबाबत संवेदना प्रकट करून पूरग्रस्तांना मुस्लिम बांधवांनी सढळ हाताने मदत करावी असेही आवाहन त्यांनी केले. 

ईदनिमित्त शाही आलमगीर मैदान, जुनी मिल कंपाऊंड आदिलशहा ईदगाह व आसार मैदानावर सामुहिक नमाजपठण झाले. संततधार पावसामुळे चिखल झाल्यामुळे रंगभवन चौकातील अहले हदीस ईदगाह मैदानावरील नमाज जमियते  अहले हदीसचे शहर काझी अ. राफे अ. सलाम यांनी रद्द केल्यामुळे होऊ शकली नाही. या परिसरातील नागरिकांनी जवळच्या दर्गाह व पानगल शाळेत नमाज अदा केली. नमाजपठण व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी मार्गावर बंदोबस्त ठेवला होता. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या व गरिबांना अन्नदान केले. 

Web Title: Link requested by Muslim brothers from Solapur to Kerala flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.