कर्जमाफीसह काटकसरीमुळे तरली सोलापूर जिल्हा बँक, २०१७ हे वर्ष मदतीचे ठरले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:37 PM2017-12-28T12:37:07+5:302017-12-28T12:46:58+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेसाठी धावून आली तसेच विविध कामासाठी होणाºया खर्चात काटकसर केल्याने जिल्हा मध्यवर्ती बँक तरण्यासाठी २०१७ हे वर्ष मदतीचे ठरले आहे.

Liquid Solapur District Bank, 2017, year by year due to loan waiver helped ...! | कर्जमाफीसह काटकसरीमुळे तरली सोलापूर जिल्हा बँक, २०१७ हे वर्ष मदतीचे ठरले...!

कर्जमाफीसह काटकसरीमुळे तरली सोलापूर जिल्हा बँक, २०१७ हे वर्ष मदतीचे ठरले...!

Next
ठळक मुद्देसोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक थकबाकी वसुलीमुळे आर्थिक अडचणीत आली आहेमागील दोन वर्षांत काटकसर व वसुलीवर भर दिलाबँकेच्या ठेवीत होणारी घसरण १९२३ कोटींवर थांबलीबँकेच्या सरकारी कर्जरोख्यात नफा ४ कोटी ३३ लाखाने वाढला


अरुण बारसकर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २७ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेसाठी धावून आली तसेच विविध कामासाठी होणाºया खर्चात काटकसर केल्याने जिल्हा मध्यवर्ती बँक तरण्यासाठी २०१७ हे वर्ष मदतीचे ठरले आहे. बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सर्व प्रकारच्या उपाययोजना करून बँकेचा खर्च वाचविला आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक थकबाकी वसुलीमुळे आर्थिक अडचणीत आली आहे. यामुळे मागील  तीन-चार वर्षांत कर्ज वाटप थांबले आहेच शिवाय दैनंदिन व्यवहार करणेही कठीण झाले होते. वरचेवर ढासळणाºया प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी मागील दोन वर्षांत काटकसर व वसुलीवर भर दिला.  मागील दोन वर्षांपासून वसुलीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडेच कर्ज थकल्याने वसुलीसाठी मोठ्या अडचणी येत असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यामुळेच विजय शुगर, आर्यन शुगर व अन्य संस्थांचा ताबा मिळविण्याची प्रक्रिया झाली. पीक विमा व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योेजनेमुळे आतापर्यंत २७५ कोटी रुपयांची शेतकºयांना कर्जमाफी मिळाली. विकास सोसायटीपातळीवर होणारा खर्चही थांबविला. अनेक तांत्रिक बाबींचा आधार घेत जिल्हा बँकेवर होणारी कारवाईही थांबविण्यास यश आले. 
-------------------------
खर्च वाचविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न
- बँकेच्या ठेवीत होणारी घसरण १९२३ कोटींवर थांबली.
- बँकेच्या सरकारी कर्जरोख्यात नफा ४ कोटी ३३ लाखाने वाढला.
- आर.टी.जी.एस., नीट, विमा, ए.टी.एम.चेकबुकच्या माध्यमातून बँकेला नफा ४ कोटी ९५ लाखाने वाढला.
- ठेवी व वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने ५६० कर्मचाºयांना वेतनवाढ दिली नाही.
च्१२५ शाखांमध्ये बायोमेट्रिकची सुविधा सुरू केली.
- चांगले काम केलेल्या मुकुंद काशिद यांना दोन हजार व हजारे यांना पाच हजारांचे बक्षीस देण्यात आले.
- कर्मचाºयांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्याने  स्वच्छता मोहिमेला गती मिळाली.
- ब्रॉडबँड, कनेक्टिव्हीटी, सीबीएस एएमसी, संगणक मेंटेनन्समध्ये दोन कोटी २९ लाख ७९ हजार रुपयांची बचत केली. 
- बँकेने नवीन पुष्कर सॉफ्टवेअर कार्यान्वित केल्याने एक कोटी ७४ लाख ४८ हजार २८४ रुपयांचा फायदा झाला. 
--------------------
कर्मचाºयांसाठी कठीण काळ...
नोव्हेंबर २०१५ मध्ये बँकेचे उत्पन्न ४३ लाख होते ते नोव्हेंबर १७ मध्ये ५ कोटी ३८ लाख म्हणजे चार कोटी ९५ लाखाने वाढले. याच कालावधीत खर्चात ८ कोटी ५ लाख रुपयांची बचत(कमी) झाली.  सरकारी कर्जरोख्यात ३३३ कोटी २० लाख रुपये गुंतवणूक करावयाची असताना ३५२ कोटी ४६ लाख इतकी गुंतवणूक केली. अपहाराच्या कारणामुळे सहा कर्मचाºयांवर गुन्हे दाखल, आठ कर्मचारी बडतर्फ, ११ कर्मचाºयांचे निलंबन तर ३५ कर्मचाºयांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर केली. 

Web Title: Liquid Solapur District Bank, 2017, year by year due to loan waiver helped ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.