भाजीपाल्याच्या पोत्यात दारूच्या पेट्या, अकरा लाखांची विदेशी दारू केली जप्त
By Appasaheb.patil | Published: January 3, 2023 07:40 PM2023-01-03T19:40:23+5:302023-01-03T19:40:48+5:30
मालवाहतूक गाडीतून भाजीपालासारख्या पोत्यात दारूच्या पेट्या भरून वाहतूक करणारा टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला.
सोलापूर - मालवाहतूक गाडीतून भाजीपालासारख्या पोत्यात दारूच्या पेट्या भरून वाहतूक करणारा टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला. या टेम्पोची तपासणी केली असता १० लाखांची विदेशी दारू ज्यामध्ये १८० पेट्या होत्या. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथे केली.
दरम्यान, भरारी पथकाचे निरिक्षक सुनिल कदम यांनी त्यांच्या स्टाफसह मंगळवार ३ जानेवारी सांगोला- मिरज रोडवरील उदनवाडी गावाच्या हद्दीत सापळा रचून एमएच ४२, बीएफ ०४६७ या मालवाहतूक टेंपोमधून विदेशी दारुच्या २१६० सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यात १० लाख ८० हजार किंमतीची दारु जप्त केली असून सतिश भानुदास सूर्यवंशी (वय ३२, रा. कळाशी ता. इंदापूर जि. पुणे) याला अटक करण्यात आली असून त्याचा एक साथीदार फरार आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सुनिल कदम, संदिप कदम, दुय्यम निरिक्षक सुनिल पाटील, कैलास छत्रे, जवान नंदकुमार वेळापुरे, प्रकाश सावंत, तानाजी काळे व वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.