पशुधन आले धोक्यात; ग्रामीण भागातील जनावरांना होतेय लंपीची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:16 PM2020-09-24T12:16:22+5:302020-09-24T12:18:16+5:30
पशुधन विकास अधिकाºयांच्या अभावाने बळीराजा हतबल; पशुधन वाचविण्याचे मोठे संकट
बºहाणपूर : अक्कलकोट तालुक्यात लंपी हा विषाणूजन्य रोग जलदगतीने पसरत आहे़ अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकºयांसमोर पशुधन वाचविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. रब्बी हंगामाच्या तयारीला लागण्याअगोदर पशुधनावर प्रादुर्भाव वाढला असून, शेतकरी हतबल झाला आहे़ त्यातच पशुधन विकास अधिकारी, पशुधन संवर्धन पर्यवेक्षकाच्या अभावाची भर पडली आहे.
एकीकडे सतत पडणाºया पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे़ बळीराजाने खरीप पिकांची रास करून रब्बी हंगामासाठी पूर्वमशागत चालू केली आहे़ या काळात अचानकपणे जनावरांच्या अंगावर फोड येऊन त्याला छिदं्र पडतात़ या फोडामधून जीवाणू बाहेर पडत आहेत़ पावसाळ्याच्या दिवसात माशी, किडे चावा घेतात़ यातून हे फोड फु टतात़ त्यामुळे या आजाराकडे सुरुवातीला शेतकºयांचे दुर्लक्ष झाले़ या लंपी आजारावर औषध, लस नसल्यामुळे अँटिबायोटिक देऊन रोखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे डॉक्टर संतोष कारळे यांनी सांगितले.
अक्कलकोट तालुक्यात ७३० गाई, म्हशी वर्गातील ३७० अशा एकूण ११०० जनावरांना लंपीची लागण झाली आहे़ त्यांच्यावर लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने एकूण ५६ हजार ५०० लसी जिल्हा परिषद पशु आरोग्य विभागाकडे उपलब्ध केल्या आहेत.
१२ गावांमध्ये पसरला लंपी
बºहाणपूर, चपळगाव, कुरनूर, हन्नूर, किणी, दोड्याळ, जेऊर, करजगी, कोर्सेगाव, गळोरगी, दहिटणे, सलगर या गावांमधील जनावरांना लंपी या विषाणूजन्य रोगाची लागण झाली आहे. या जनावरांना जिल्हा परिषद पशुवैद्यकीय आरोग्य विभागाकडून लसीकरण करून त्यांना विलगीकरण करण्यात येत आहे. परंतु तालुक्यात बहुतांश गावातील जनावरे पशुवैद्यकीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या अभावामुळे तडफडत आहेत.
लंपी रोगाची उत्पत्ती चावणाºया माशापासून होते. हे विषाणूजन्य रोग असले तरी उपचाराने कमी होणार आहे. लागण झालेल्या जनावरांच्या अंगावर धबडे, पुरळ, ताप येणे व चारा न खाणे अशी लक्षणे असतात. अशी लक्षणे आपल्या जनावरांमध्ये दिसल्यास पशुपालकांनी तत्काळ जवळील जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घ्यावेत.
- तोलाराम राठोड,
तालुका पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, अक्कलकोट.