बचत गट महिलांना ४ लाख ८० हजारांचे कर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:23 AM2021-09-27T04:23:45+5:302021-09-27T04:23:45+5:30
पंचायत समिती सांगोला उमेद अंतर्गत सक्षम महिला प्रभाग संघ कडलासतर्फे आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मुख्य ...
पंचायत समिती सांगोला उमेद अंतर्गत सक्षम महिला प्रभाग संघ कडलासतर्फे आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील, स्मिता पाटील, सभापती राणी कोळवले, उपसभापती नारायण जगताप, झेडपी सदस्य सचिन देशमुख, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, जिल्हा अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मंडळी, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव उपस्थित होते. यावेळी आठवडी बाजार, प्रभाग संघ कार्यालयाचे उद्घाटन, तालुका उद्योग विकास केंद्राचे उद्घाटन झाले.
यासाठी प्रभाग संघ अध्यक्षा उषा येलपले, सचिव राजाक्का काटे, कोषाध्यक्ष मैना केदार, व्यवस्थापक मेघा ऐवळे, लिपिक सुरेखा काटे, तालुका अभियान व्यवस्थापक कुणाल पाटील, दीपमाला सोमाणे, अमोल सावंत, महंतवीर घाडगे, सुधीर पिसे, महेश साठे, किशोर बिडे, अभिजित महादेवकर, राहुल माने, सचिन भोसले, दीपक गाडे, अजित वाघमारे, पंचरत्न राजपाल यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ :::::::::::::
अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी. यावेळी मान्यवर उपस्थित होते.