कर्जमाफी, सोलापूर जिल्ह्यातील १५ बँकांच्या ३२७ शाखांतून १४ हजार ८७१ शेतकºयांच्या खात्यावर जमा केले ११३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:13 PM2017-12-16T13:13:22+5:302017-12-16T13:14:56+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची १५ राष्टÑीयीकृत बँकांनी १४ हजार ८७१ शेतकºयांच्या बँक खात्यावर ११३ कोटी ३१ लाख ३४ हजार २२७ रुपये इतकी रक्कम जमा केली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची १५ राष्टÑीयीकृत बँकांनी १४ हजार ८७१ शेतकºयांच्या बँक खात्यावर ११३ कोटी ३१ लाख ३४ हजार २२७ रुपये इतकी रक्कम जमा केली आहे.
राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीत सर्वाधिक शेतकरी जिल्हा बँकेचे असून, राष्टÑीयीकृत बँकांची रक्कम सध्यातरी कमीच दिसते. जिल्ह्यातील एकूण ३० राष्टÑीयीकृत बँकांपैकी १५ बँकांची सुरुवातीची माहिती मिळाली असून, त्यानुसार १४ हजार ८७१ शेतकºयांच्या बँक खात्यावर ११३ कोटी ३१ लाख ३४ हजार २२७ रुपये जमा झाले आहेत. विदर्भ कोकण बँकेच्या ५ हजार ७६२ शेतकºयांच्या खात्यावर ४३ कोटी ७२ लाख ९ हजार ४९८ रुपये जमा केले आहेत. या बँकेच्या जिल्हाभरात ३५ शाखा आहेत. स्टेट बँक आॅफ इंडियाने २३६८ शेतकºयांच्या खात्यावर १८ कोटी ४१ लाख ६० हजार रुपये, बँक आॅफ इंडियाने २६१६ शेतकºयांची २३ कोटी ८० लाख ८१ हजार २५९ रुपये, बँक आॅफ महाराष्टÑने १६८६ शेतकºयांची १४ कोटी ६८ लाख ४८ हजार, युनियन बँक आॅफ इंडियाने ५ कोटी ५९ लाख ११ हजार ७६ रुपये, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ४४५ शेतकºयांची ३ कोटी ८६ लाख, आय.सी.आय. सी.आय. बँकेने ५२१ शेतकºयांची एक कोटी ३१ लाख ४३ हजार ७३० रुपये इतकी रक्कम जमा केली आहे.
बँक आॅफ बडोदाने १६७ शेतकºयांचे ७५ लाख ९८ हजार ५९० रुपये, आंध्र बँकेने चार शेतकºयांच्या खात्यावर दोन लाख ७५ हजार ६७ रुपये, ओरिएंटल बँकेने चार शेतकºयांचे दोन लाख पाच हजार ७४९ रुपये, सिंडीकेट बँकेने ३५ शेतकºयांच्या खात्यावर ३० लाख २४ हजार ६३० रुपये, युको बँकेच्या ७४ शेतकºयांचे ६९ लाख ७० हजार ३२० रुपये, विजय बँकेने ८ शेतकºयांचे दोन लाख ६४ हजार ९८२ रुपये, फेडरल बँकेने १६ शेतकºयांचे ७ लाख ३८ हजार ७५९ रुपये, कर्नाटका बँकेने दोन शेतकºयांचे एक लाख दोन हजार ५६७ रुपये जमा केले आहेत.
-------------------
एकूण झाले ३८८ कोटी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योेजनेच्या कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यात विविध प्रकारच्या ३१ बँका असून, त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. याशिवाय अन्य ३० पैकी १५ बँकांची माहिती आली असून, उर्वरित १५ बँकांची अद्याप माहिती आली नसल्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेला आतापर्यंत २७५ कोटी तर राष्टÑीयीकृत बँकांना ११३ कोटी असे एकूण ३८८ कोटी रुपये जिल्ह्यातील शेतकºयांना आले आहेत.