विणकरांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:07+5:302021-08-12T04:26:07+5:30

अक्कलकोट : मैंदर्गी आणि वागदरी येथे राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त उत्पादकांबरोबर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ...

The local market will be made available to the weavers | विणकरांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणार

विणकरांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणार

Next

अक्कलकोट : मैंदर्गी आणि वागदरी येथे राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त उत्पादकांबरोबर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी तासभर सकारात्मक चर्चा केली. यामुळे कापड उत्पादकांचे आशा पल्लवित झाल्या आहेत.

राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त आमदार कल्याणशेट्टी यांनी मैंदर्गी, वागदरी येथे भेट देऊन विणकर वर्गासमोरील समस्यांवर चर्चा केली. त्याप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विणकर कामगारांचा सत्कार करण्यात आला.

एकेकाळी विणकर क्षेत्रात देशभरात अक्कलकोट तालुक्याचा नावलौकिक होता. कालांतराने विविध समस्यांंनी अडचणी येत गेल्या. अनेक जण व्यवसाय बंद केला. आता बोटावर मोजण्याइतके विणकर वर्ग शिल्लक राहिला आहे. झालेल्या चर्चेत राष्ट्रपती पुरस्कार विजेते पार्वती नागठाण, सोमनाथ म्हेत्रे, बसवणप्पा गडदे, संगमनाथ गोब्बूर, शारदा गोब्बूर, इरणा जेऊर, मल्लिनाथ मुंडोडगी, शब्बीर मल्लेभारी, शब्बीर झळकी, शब्बीर पंजेशाहा, खुदाब नाईकवाडी यांच्याशी चर्चा झाली, तसेच तयार होणाऱ्या मालाला अक्कलकोट, सोलापूर अशा जवळच्या ठिकाणी बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येथील यावर सकारात्मक चर्चा केली.

यावेळी राजशेखर मसुती, शिवकरण केसूर, मोतीराम राठोड, मल्लिनाथ मसुती, गुरुपादप्पा आळगी उपस्थित होते.

-----

फोटो : १० अक्कलकोट २

मैंदर्गी येथे विणकरांशी संवाद साधताना आमदार सचिन कल्याणशेट्टी.

Web Title: The local market will be made available to the weavers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.