स्थानिक फडकरी, मठाधिपतींनी पोहचवला पांडुरंगास लाखों वारकऱ्यांचा सांगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:20+5:302021-04-24T04:22:20+5:30

सुमारे चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या चैत्री यात्रेला कोरोनाच्या संकटामुळे वारकरी भाविक यावर्षीदेखील पंढरीला येऊ शकले नाहीत. लाखो वारकऱ्यांच्या ...

The local Phadkari, the abbot, conveyed the message of lakhs of Warakaris to Panduranga | स्थानिक फडकरी, मठाधिपतींनी पोहचवला पांडुरंगास लाखों वारकऱ्यांचा सांगावा

स्थानिक फडकरी, मठाधिपतींनी पोहचवला पांडुरंगास लाखों वारकऱ्यांचा सांगावा

Next

सुमारे चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या चैत्री यात्रेला कोरोनाच्या संकटामुळे वारकरी भाविक यावर्षीदेखील पंढरीला येऊ शकले नाहीत. लाखो वारकऱ्यांच्या वतीने स्थानिक फडकरी, मठाधिपती आणि महाराज मंडळींनी शासनाच्या नियमांचे पालन करीत सुरक्षित अंतर ठेवून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत चंद्रभागा स्नान, दैनंदिन भजन, कीर्तन आणि नगरप्रदक्षिणा पूर्ण करीत चैत्री यात्रा पोहोच केली.

वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रेला महत्त्व आहे. या चारही यात्रांच्या वेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीने तीर्थक्षेत्र पंढरीनगरी अक्षरश: फुलून गेलेली असते. मात्र, सलग दुसऱ्यांदा चैत्री यात्रेमध्ये असे काहीच वातावरण तीर्थक्षेत्र पंढरीत दृष्टीस पडले नाही. त्यामुळे चैत्री (कामदा) एकादशी असूनदेखील पंढरीनगरी वारकऱ्यांविना अगदी सुनी- सुनी जाणवली.

दरम्यान, चैत्री एकादशीनिमित्त मंदिरात परंपरेप्रमाणे पहाटे विठ्ठल आणि रखुमाईची नित्यपूजा झाली. मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्तेच ही पूजा पार पडली. यावेळी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर, समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

मंदिरात द्राक्षांची आकर्षक सजावट

चैत्री एकादशीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल आणि रक्मिणीच्या गाभाऱ्यात सातशे किलो द्राक्षांच्या घडांचा वापर करीत अत्यंत मनमोहक आणि आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मीटाकळी येथील विठ्ठलभक्त संजय टिकोरे यांनी द्राक्षाची सेवा समर्पित केली.

----

२३पंड०१

चैत्री यात्रा असूनदेखील कोरोना संसर्गामुळे मंदिर परिसर ओस पडल्याचा दिसून आले.

२३पंड०२

चैत्री एकादशीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या गाभाऱ्यास सातशे किलो द्राक्षांच्या घडांचा वापर करीत सुंदर सजावट करण्यात आली.

२३पंड०३

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्री यात्रेचा सोहळा स्थानिक मठाधिपतींनी शासनाच्या नियमांचे पालन करीत मोजक्या मंडळींबरोबर नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.

Web Title: The local Phadkari, the abbot, conveyed the message of lakhs of Warakaris to Panduranga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.