Maharashtra Election 2019; सोलापूर जिल्ह्यातील ७२ मतदान केंद्रांची ठिकाणे बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 02:28 PM2019-10-15T14:28:53+5:302019-10-15T14:30:31+5:30
३० केंद्रांच्या नावात बदल; नव्याने झाली ४१ सहायकारी मतदान केंद्रे
सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांतील ७२ मतदान केंद्रांची ठिकाणे बदलण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक आठवडा उरला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी बैठका घेऊन आदर्र्श आचारसंहितेचा अंमल कडकपणे करावा व मतदान केंद्रांवर सर्व ती व्यवस्था करावी, अशा सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ३५२१ मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा पूर्ण करण्याबाबत दक्षता घेण्यात आल्या आहेत. शहर आणि जिल्ह्यात बºयाच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर किंवा मार्गावर चिखल, खड्डे असतील तर महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी याबाबत दखल घ्यावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. मतदारांना मतदान करण्यासाठी येताना मार्ग सुकर असावा काळजी घेण्याबाबत सूचित केले आहे.
अकरा विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. छोटी जागा व इमारतींचे पाडकाम यामुळे ७२ मतदान केंद्रांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय ठिकाणे बदललेल्या मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
माढा: १४, बार्शी: १५, मोहोळ: २२, सोलापूर शहर उत्तर: २, शहर मध्य: १, अक्कलकोट: ४, दक्षिण सोलापूर: ५, पंढरपूर: ३, सांगोला: ४, माळशिरस: २, त्याचप्रमाणे मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे. मतदारसंघनिहाय नावात बदल केलेल्या मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. मोहोळ: २४, पंढरपूर: ६, नव्याने होणाºया सहायकारी मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. बार्शी: ६, सोलापूर शहर उत्तर: ८, शहर मध्य: १0, अक्कलकोट: १, दक्षिण सोलापूर: १६.
या मतदान केंद्रांवर महिलाराज
जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर महिला कर्मचाºयांचे राज्य असणार आहे. त्या केंद्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. करमाळा: केंद्र क्र. ९२, नगरपालिका उर्दू मुलांची शाळा, मेनरोड करमाळा, माढा: केंद्र क्र. ८0, झेडपी प्राथमिक मुलांची शाळा क्र. १, बार्शी: केंद्र क्र. ११६, जिजामाता विद्यामंदिर, मोहोळ: केंद्र क्र. १0३, झेडपी प्राथमिक शाळा, दत्तनगर, सोलापूर शहर उत्तर: केंद्र क्र. १0३, शरदचंद्र पवार प्रशाला, उमानगर, शहर मध्य: केंद्र क्र. २८२, सेल्स टॅक्स आॅफिस, होटगी रोड, अक्कलकोट: केंद्र क्र. १४५, श्री शहाजी हायस्कूल, दक्षिण सोलापूर: केंद्र क्र. २८३, नेताजी सुभाषचंद्र प्रशाला, पंढरपूर: केंद्र क्र. ९७, द. ह. कवठेकर प्रशाला, सांगोला: केंद्र क्र. १६६, झेडपी प्राथमिक शाळा, पुजारवाडी, माळशिरस: केंद्र क्र. १३६, झेडपी प्राथमिक मुलांची शाळा क्र. १.