लॉकडाऊनमध्ये मोडनिंबचा आडत बाजार ३५ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:15 AM2021-07-09T04:15:42+5:302021-07-09T04:15:42+5:30

मोडनिंब : गतवर्षी कोरोनाच्या कालावधीत घसरलेल्या भुसार मालाच्या आवकात चांगली वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा आधारवड असलेली आडत बाजारपेठ पूर्वपदावर ...

In the lockdown, the market value of Modenimb is over Rs 35 crore | लॉकडाऊनमध्ये मोडनिंबचा आडत बाजार ३५ कोटींवर

लॉकडाऊनमध्ये मोडनिंबचा आडत बाजार ३५ कोटींवर

Next

मोडनिंब : गतवर्षी कोरोनाच्या कालावधीत घसरलेल्या भुसार मालाच्या आवकात चांगली वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा आधारवड असलेली आडत बाजारपेठ पूर्वपदावर आली असून या काळात ही उलाढाल २२ कोटींनी वाढली आहे.

भुसार, बोरे, कांदा, टोमॅटो यांची आडत बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती १९५४ मध्ये सुरू झाली. ४० वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात लाल मिरची उत्पादनासाठी मोडनिंब आडत बाजारपेठ प्रसिद्ध होती. आता मोडनिंब आडत बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली.

पूर्वी मोडनिंबच्या आडत बाजारात माढासह मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणत होता. सध्या या भागात ५० टक्के शेतकऱ्यांनी ऊस, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, निंबोणी यासारख्या फळपिकांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

---

जयपूर, राजस्थानमधून व्यापारी बाजारात

सध्या बळीराजा ज्वारी, मका, गहू तसेच खरीप हंगामातील उडीद, मूग यासारखे धान्य विक्रीसाठी आडत बाजारात घेऊन येत आहेत. सध्या आडत बाजारात ५९ आडत दुकाने असून दिल्ली, राजस्थान, जयपूर, गुजरात, अहमदाबाद या भागातून ऑगस्टमध्ये टोमॅटो खरेदी तर ऑक्टोबरनंतर बोर खरेदी करण्यासाठी व्यापारी मोडनिंब येथे येतात.

---

यापूर्वी भुसार उत्पादन करीत होतो. परंतु, शेतीची मशागत व काढणीपर्यंत येणारा खर्च व त्यानंतर शेतमालाला मिळणारा भाव पाहता भुसार मालाचे उत्पादन घेणे परवडत नसल्यामुळे द्राक्ष व डाळिंब या फळपिकांकडे वळलो.

- विनायक गाजरे

शेतकरी, अरण

----

शेतकरी यंदा मोठ्या प्रमाणात फळ उत्पादनाकडे वळलेला आहे. केंद्र शासनाच्या जाचक नियम व अटींमुळे नवीन व्यापारी येण्यास धजावत नाहीत.

पोपटलाल दोभाडा

- माजी संचालक, बाजार समिती

Web Title: In the lockdown, the market value of Modenimb is over Rs 35 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.