टँकरने पाणीपुरवठा अन् घामांनी फुलवलेल्या बागेभोवतालचा लॉकडाउन हटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:48 AM2020-04-21T11:48:44+5:302020-04-21T11:49:52+5:30
बळीराजा धास्तावला; १५ लाखांच्या चिक्कूला लागलेलं कोरोनाचा ग्रहण सुटेना !
कारी : दहा वर्षांपूर्वी तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग फुलवली़़़ प्रत्येक उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करून ती जगवली़़़ आज फळं लगडली़़़ मात्र, कोरोनाचे अरिष्ट बळीराजावर ओढवले़़़ आज नऊ एकरावरील चिक्कूभोवती लॉकडाउनचा फास लागला आहे़़़ महिनाभरापासून कोरोनाचे ग्रहण सुटत नसल्याने १५ लाखांच्या चिक्कूची नासाडी होत आहे.
ही करुण कहाणी आहे बार्शी तालुक्यातील बेलगाव (मांडे) येथील प्रकाश पाटील या शेतकºयाची़ बळीराजा हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो़ काबाडकष्ट करून मानवाची भूक भागवतोय़ आपलं दु:ख समाजाला न दाखविता येणाºया संकटापुढे हार न मानता लढा देत राहिला आहे. असा हा अन्नदाता कोरोनाच्या महामारीतसुद्धा कष्टाची मोठ बांधून शेती पिकवण्याचा प्रयत्न करतोय़ लॉकडाउनच्या काळात देखील भाजीपाला, फळे व अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे. पिकवलेली फळं अन् भाजीपाला बाजारपेठेअभावी तो हतबल झाला आहे.
बार्शी तालुक्यात बेलगाव (मांडे) येथील शेतकरी प्रकाश पाटील यांनी अथक परिश्रमातून चिक्कूची बाग उभारली़ २००८ साली कृषी विभागाच्या फळझाड लागवड योजनेतून कालीपती जातीच्या चिक्कूची ९ एकरावर ३९० रोपं लावली़ भीषण टंचाईतसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करून ही बाग तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवली़ शेणखत फवारणीसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी तीन लाख खर्च केले आहेत. चालू वर्षी शेणखतामुळे लगडून गेलेल्या चिक्कूच्या फांद्या जमिनीवर टेकल्या़ एकरी ३० टन फळ निघेल, असा अंदाज आहे़ मात्र लॉकडाउनमुळे पूर्ण क्षेत्रातील २५० टन विक्रीयोग्य चिक्कू बाजारपेठ बंदअभावी गळून गेला आहे़ काढणीयोग्य फळाच्या ओझ्यामुळे अनेक फांद्या माना टाकल्या आहेत़ झाडाच्या खाली चिक्कूची नासाडी होऊ लागली आहे.
दोन महिने बाग जगवली टँकरवर
- गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने उन्हाळ्यात पूर्ण दोन महिने टँकरने पाणीपुरवठा केला़ परिणामी सद्यस्थितीला दिवसाकाठी दोन ते अडीच हजार रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च के ले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे चालू हंगामात जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एकंदरीतच श्रमाने बाग उभी केली अन् कोरोनाने हिरावून घेतली, अशी स्थिती शेतकºयांची झाली आहे.
देशपातळीवर विचार करता देशावर आलेल्या कुठल्याही संकटाचे पडसाद शेतकºयावर उमटतात. कोरोनाचा सर्वात मोठा आर्थिक फटका हा शेतकरी वर्गाला बसला आहे़ बळीराजाच्या या नुकसानीचा शासन स्तरावर विचार व्हायला हवा़ शेतकºयाला नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा जगाचा पोशिंदा बळीराजाचा कणा मोडून पडेल़
- प्रकाश पाटील, चिक्कू उत्पादक