लॉकडाऊनने नोकरी हिरावली, पारंपरिक शेती डेव्हलप केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:23 AM2021-03-23T04:23:31+5:302021-03-23T04:23:31+5:30
संतोष टोणपे यांना लॉकडाऊनमध्ये घरी थांबण्यास सांगितले. त्यांनी लॉकडाऊनचा सदुपयोग करून पारंपरिक माळरानावरील पाच एकर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून ...
संतोष टोणपे यांना लॉकडाऊनमध्ये घरी थांबण्यास सांगितले. त्यांनी लॉकडाऊनचा सदुपयोग करून पारंपरिक माळरानावरील पाच एकर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेती डेव्हलप केली. नोकरीला पर्याय व्यवस्था निर्माण केली. या शेतीतून वर्षाला किमान पाच-सहा लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी व्यवस्था करून ठेवली. माळरानाचे नंदनवन केले आहे. शेतात पूर्वीपासूनच एक बोअर होता, जुनी विहीर होती. परंतु शेतीत कोणीही लक्ष देत नसल्याने काहीही पिकत नव्हते. संतोष टोणपे हे लॉकडाऊन काळात गावी आल्यानंतर कुटुंबाबरोबर शेतात लक्ष देत, मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाकडे ही लक्ष देत त्यांनी आपल्या शेतात अगदी मनापासून वाहून घेतलं. पाच एकर शेतीमध्ये एक शेततळे खोदून योग्य नियोजन करीत शाश्वत पाण्याची उपलब्धता निर्माण केली. सध्या या शेतात ऊस असून त्यातून पाच सहा लाख रुपये उत्पन्न निघेल, अशी व्यवस्था त्यांनी केली आहे.
उत्पन्नाचे साधन उपलब्ध केले
संतोष टाेणपे हे स्वतः शेतात मजुरांबरोबर कष्ट करू लागले. त्यामुळे त्यांच्या शेतात सध्या पाच एकर ऊस हा डोलत आहे. लॉकडाऊन काळ संपल्यावर त्यांना पुन्हा कामावर जॉईन व्हावे सांगितले तर त्यांनी विकसित केलेली शेती मात्र त्यांना आता बसू देत नाही. त्यामुळे त्याचेही योग्य नियोजन ते सुटी दिवशी येऊन करीत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळात त्यांनी सकारात्मक विचार ठेवून नोकरीला दुसरा पर्याय म्हणून शेती विकसित केली आहे.
२२संतोष टोणपे