महावितरण कार्यालयास टाळे ठोक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:30+5:302021-02-06T04:40:30+5:30
अकलूज येथील महावितरण कार्यालयावर भाजप संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, किसान मोर्चा सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, माजी ...
अकलूज येथील महावितरण कार्यालयावर भाजप संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, किसान मोर्चा सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, माजी अध्यक्ष बाळासाहेब सरगर, संजय देशमुख, रणवीर देशमुख, फातिमा पाटावाला यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हल्लाबोल आंदोलन केले.
कोरोनानंतर सामान्य जनतेला प्रचंड आर्थिक झळ बसली आहे. कोरोना काळातातील अवाजवी बिल भरण्याची क्षमता सर्वसामान्य माणसात नाही. शेतकरी व सामान्य जनता वीज बिल भरण्याच्या मन:स्थितीत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते, ते पाळले नाही. जनतेला खोटी आश्वासने देऊन गंडविण्याचा प्रकार महाविकास आघाडीकडून चालू असून, शासनाने सक्तीची वीज बिल वसुलीच्या नावाखाली जनतेची व शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी, असेही मोहिते-पाटील म्हणाले.
फोटो लाईन ::::::::::::::::::
अकलूज येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकताना धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते.