Lok sabha Election 2019; राज्यात २ लाख २४ हजार दिव्यांग मतदार, दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा

By appasaheb.patil | Published: March 23, 2019 06:55 PM2019-03-23T18:55:57+5:302019-03-23T18:59:27+5:30

सोलापूर :  राज्यातील दिव्यांग मतदारांना यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. दिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच भारत निवडणूक ...

Lok sabha Election 2019; 2 lakh 24 thousand Divyan voters in the state | Lok sabha Election 2019; राज्यात २ लाख २४ हजार दिव्यांग मतदार, दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा

Lok sabha Election 2019; राज्यात २ लाख २४ हजार दिव्यांग मतदार, दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा

Next
ठळक मुद्देदिव्यांग मतदारांना यंदाची निवडणूक अधिक सुलभदिव्यांगांसाठी काम करणा?्या स्वयंसेवी संस्था तसेच अपंग कल्याण आयुक्तालय यांचीही या कामी मदत घेण्यात येत आहेदिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच भारत निवडणूक आयोगाने यंदा त्यांच्यासाठी पीडब्ल्यूडी हे नवीन मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करुन दिले

सोलापूर :  राज्यातील दिव्यांग मतदारांना यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. दिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच भारत निवडणूक आयोगाने यंदा त्यांच्यासाठी पीडब्ल्यूडी हे नवीन मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करुन दिले आहे. निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणुक  हे घोषवाक्य निश्चित केले आहे.

राज्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या २ लाख २४ हजार १६२ इतकी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले ३७ हजार ३२४, मूकबधीर २४ हजार ७७, शारीरिक अपंगत्व असलेले १ लाख ८ हजार २२ तर इतर अक्षमता असलेले ५४ हजार ३९ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने यंदा मोठा पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात ३ डिसेंबर २०१८ रोजी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

दिव्यांगांसाठी काम करणा?्या स्वयंसेवी संस्था तसेच अपंग कल्याण आयुक्तालय यांचीही या कामी मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या सहाय्याने यंदा दिव्यांग मतदारांची विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली. अपंगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत सर्व जिल्हाधिका?्यांना देण्यात आले आहेत. या सर्व सुविधांबाबत निवडणुकीशी संबंधित अधिका?्यांना विविध प्रशिक्षणांमध्ये अवगत करण्यात आले आहे. दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर सुकाणू समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हील चेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा असणार आहेत. याशिवाय मागणीनुसार मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक व्यवस्था तसेच व्हीलचेअरची सुविधाही प्रशासनामार्फत उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

दिव्यांगांसाठी अ‍ॅप
दिव्यांगांची मतदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी पीडब्ल्यूडी  हे अ‍ॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे मोबाईल ?प डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या ?पवर जाऊन मागणी केल्यास दिव्यांग मतदारांना प्रशासनामार्फत व्हीलचेअर तसेच मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. भात्याग करतो असा इशारा देत प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. समयसूचकता दाखवित उपाध्यक्ष पाटील यांनी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे घोषित केले.

Web Title: Lok sabha Election 2019; 2 lakh 24 thousand Divyan voters in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.