सोलापुरातून ४१ तर माढ्यातून ४२ जणांचे अर्ज
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 19, 2024 18:48 IST2024-04-19T18:46:59+5:302024-04-19T18:48:25+5:30
Lok Sabha Election 2024 : १९ एप्रिल रोजी उमेदवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी माढ्यातून २२ उमेदवारांनी २३ अर्ज भरले.

सोलापुरातून ४१ तर माढ्यातून ४२ जणांचे अर्ज
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एकूण ४१ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले असून माढ्यातून ४२ उमेदवारांनी ५५ अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
शुक्रवार, १९ एप्रिल रोजी उमेदवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी माढ्यातून २२ उमेदवारांनी २३ अर्ज भरले. माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी सोलापुरातून अर्ज दाखल केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. सचिन देशमुख यांनी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रा. लक्ष्मण हाक्के यांनी माढ्यातून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केले. प्रा. हाक्के हे महात्मा ज्योतीराव फुले यांच्या वेशभूषेत येऊन अर्ज भरला. शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची महसूल भवन परिसरात गर्दी होती.