देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:31 AM2024-05-02T04:31:36+5:302024-05-02T04:33:16+5:30
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. कर्णिक नगर येथील वल्याळ क्रीडांगणावर त्यांची सभा झाली.
सोलापूर : देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा असून त्यांच्या 'फॅमिली फर्स्ट' या वृत्तीमुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे काँग्रेसला दूर करा. 'नेशन फर्स्ट'ला प्राधान्य देणाऱ्या नरेंद मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी सोलापूरच्या सभेत केले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. कर्णिक नगर येथील वल्याळ क्रीडांगणावर त्यांची सभा झाली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह इतर स्थानील पदाधिकारी उपस्थित होते.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात उद्भवलेल्या वादावर देखील योगींनी यावेळी भाष्य केले. ते पुढे म्हणाले, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात माझेही नाव समोर आणण्याची धमकी त्यावेळी दिली गेली.
त्यांच्या स्वागतासाठी मी सज्ज होतो. मागील ६५ वर्षात काँग्रेसने केवळ जातीयवादाचे राजकारण केले. जातीय जनगणना करू, असे ते म्हणतायेत. विकसित भारतची संकल्पना त्यांना मान्य नाहीये.