सोलापूर, माढा लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; निकालाची उत्सुकता शिंगेला ?

By Appasaheb.patil | Published: June 4, 2024 08:07 AM2024-06-04T08:07:26+5:302024-06-04T08:12:56+5:30

Solapur Lok sabha Election Result 2024 : सोलापूर व माढा लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. आज मंगळवार ४ जून २०१४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रामवाडी गोदामात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

lok sabha election result 2024 solapur and madha lok sabha vote counting begins curious about the result | सोलापूर, माढा लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; निकालाची उत्सुकता शिंगेला ?

सोलापूर, माढा लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; निकालाची उत्सुकता शिंगेला ?

आप्पासाहेब पाटील, सोलापूर :सोलापूर व माढा लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. आज मंगळवार ४ जून २०१४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रामवाडी गोदामात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढत झाली. तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंग नाईक- निंबाळकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्यात मोठी लढत झाली.

दरम्यान, आज मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या एका तासात पहिल्या फेरीचा लागणार निकाल लागणार आहे. सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण २ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामवाडीच्या  १८ गोदामात ३२ सीसीटीव्हींची नजर या मतमोजणी प्रक्रियेवर असणार आहे. पहिल्या फेरीनंतर प्रत्येक फेरीचा निकाल केवळ पंधरा मिनिटात लागणार आहे.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव रामवाडीच्या शंभर मीटर परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे, खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहे.

Web Title: lok sabha election result 2024 solapur and madha lok sabha vote counting begins curious about the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.