लोकसभा ध्येय नव्हतेच; आता संजयमामांनाच आमदार करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 05:05 PM2019-06-15T17:05:38+5:302019-06-15T17:08:12+5:30
कार्यकर्त्यांचा सूर : करमाळ्यात संजय शिंदे गटाची बैठक
करमाळा : संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी केला असून, संजयमामा हाच आपला पक्ष आहे. करमाळ्यात विकासकामांच्या जोरावर संजयमामा शिंदे यांनी स्वत:चा गट निर्माण केला असून, लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी लोकसभा लढविणे हे मामांचे ध्येय नव्हतेच. संजयमामांना आमदार करणे हे आपले ध्येय आहे, असा सूर बैठकीत कार्यकर्त्यांनी लावला.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर संजयमामा श्ािंदे विधानसभा निवडणूक लढविणार का, असा प्रश्न करमाळ्यात शिंदे समर्थकांसह राजकीय वर्तुळात चर्चा आहे. झेडपीचे माजी सदस्य वामन बदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सुनील सावंत, कन्हैय्यालाल देवी, चंद्रकांत सरडे, विलास राऊत, विलास पाटील, दत्ता जाधव, गौरव झांजुर्णे, सुजित बागल, विवेक येवले, तात्या मस्कर, तानाजी झोळ, डॉ. गोरख गुळवे, सतीश शेळके, भास्कर भांगे, अभयसिंह राजेभोसले, राजेंद्र बारकुंड, तात्या सरडे, सतीश सूर्यवंशी, संजय सावंत, विनय ननवरे, उदय ढेरे, महादेव फंड, नीलेश कुटे, कैलास पाखरे, विकास गलांडे, गौतम ढाणे, शहाजी झिंजाडे, भोजराज सुरवसे, रेवणनाथ रोडगे, विनोद महानवर, युवराज गपाट, डॉ. सुभाष शेंद्रे, बबन मुरूमकर, विनोद जाधव, राजेंद्र बाबर, देविदास वाघ, सुभाष अभंग, अशपाक जमादार उपस्थित होते.
लोकसभेत मामांचा अविश्वास
- लोकसभा निवडणूक लढविताना संजयमामा शिंदे यांनी आम्हाला विश्वासात घेतले नव्हते. गेल्या साडेचार वर्षांपासून करमाळ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा शब्द आम्हाला मामांनी दिला होता. त्यानुसार आता विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह करण्यासाठी गटाचे ज्येष्ठ नेते वामन बदे यांच्या नेतृत्वाखाली संजयमामा शिंदे यांना दोन दिवसात निमगाव येथे भेटणार असल्याचे सुनील सावंत, चंद्रकांत सरडे, कन्हैय्यालाल देवी यांनी बैठकीत सांगितले.
बागल गटात चिंता
लोकसभा निवडणुकीची संजयमामा शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बागल गटाने विधानसभा निवडणुकीत आपला मार्ग सुकर होईल, या दृष्टीने संजयमामा शिंदे यांचा प्रचार केला होता. पण मामांचा पराभव झाल्यानंतर आता शिंदे यांचे समर्थक संजयमामांनी विधानसभा लढवावी, असा आग्रह करू लागल्याने बागल गटातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. आता संजयमामा काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.