lokmat Agrostav ; सोलापुरी डाळिंब, ऊस, द्राक्षाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा कृषी महोत्सव पंढरपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 06:48 PM2019-02-06T18:48:21+5:302019-02-06T18:56:24+5:30

पंढरपूर : आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या सोलापुरी डाळिंब आणि द्राक्ष उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘लोकमत’ने पंढरपूर येथे ‘अ‍ॅग्रोत्सव २०१९’ ...

lokmat agrostav; Krishi Mahotsav in Pandharpur, connecting Solapur, Pomegranate, Sugarcane, and Grape to modern technologies. | lokmat Agrostav ; सोलापुरी डाळिंब, ऊस, द्राक्षाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा कृषी महोत्सव पंढरपुरात

lokmat Agrostav ; सोलापुरी डाळिंब, ऊस, द्राक्षाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा कृषी महोत्सव पंढरपुरात

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’ने पंढरपूर येथे ‘अ‍ॅग्रोत्सव २०१९’ या कृषी महोत्सवाचे आयोजन केलेयेत्या १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाºया महोत्सवात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कृषीविषयक योजनांची माहिती अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर चर्चाही होणार

पंढरपूर : आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या सोलापुरी डाळिंब आणि द्राक्ष उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘लोकमत’ने पंढरपूर येथे ‘अ‍ॅग्रोत्सव २०१९’ या कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. येत्या १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाºया महोत्सवात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कृषीविषयक योजनांची माहिती अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर चर्चाही होणार आहे.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पंढरपूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा अ‍ॅग्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या जिल्ह्यात डाळिंब, ऊस आणि द्राक्षे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. एकेकाळी ज्वारीचे कोठार समजला जाणारा हा जिल्हा आता कात टाकतो आहे. शेतकºयांचा ओढा नगदी पिकाकडे असून शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्यावर त्यांचा भर आहे. मात्र त्यांना आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याची गरज आहे. ‘लोकमत’ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषी क्षेत्रात काम करणाºया संस्था-कंपन्या यांचा या अ‍ॅग्रोत्सवात सक्रिय सहभाग असणार आहे.

यात शासकीय योजनांची माहिती, नवे प्रकल्प, नवनवीन संशोधन यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे़ कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ आणि आत्मा या कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी होत आहेत़ महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचेही सहकार्य लाभणार आहे.  चार दिवसांत कृषी प्रदर्शन, नवीन कृषी तंत्रज्ञान, दुग्धोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषीपूरक उद्योग, उत्पादित कृषी मालाला बाजारपेठ, सेंद्रिय शेती यावर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यातील मान्यवरांचे मार्गदर्शन
- राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षे, केळी, सीताफळ, चिकू, बोर या फळबागांना जोपासणे हे मोठे संकट आहे. शेतकºयांसाठी हे आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी कमी पाण्यात शेती, उपलब्ध पाण्याचा वापर, सूक्ष्म सिंचन, चारा निर्मिती यावर कृषी क्षेत्रातील मान्यवरांशी सल्लामसलत, चर्चा करण्याची संधी शेतकºयांना उपलब्ध होणार आहे.

पीक उत्पादन स्पर्धा आणि पुरस्कार
- सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकरी ऊस, फळबाग उत्पादनात आघाडीवर आहेत. त्यांच्या कृषी उत्पादनांचे प्रदर्शन, दर्जेदार आणि विक्रमी पीक उत्पादन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकºयांना विक्रमी पीक उत्पादनाबाबत पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात येणार आहे. तरी पश्चिम महाराष्टÑातील शेतकºयांनी जास्तीत जास्त संख्येने या पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्टÑातल्या शेतकºयांसाठी लोकमतने सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. पश्चिम महाराष्टÑातील शेतकºयांसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून डाळिंब, द्राक्षे अन् ऊस यांच्यासह इतर पिकांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही शेतकºयांना मिळणार आहे.  याचा लाभ शेतकºयांनी घ्यावा.
- प्रशांत परिचारक
आमदार

सोलापूर जिल्हा फळबागांच्या उत्पादनात अग्रेसर आहे. पाणीटंचाईवर मात करून शेतकरी डाळिंब, द्राक्षे पिके घेतात. सध्याच्या दुष्काळी स्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ऊस उत्पादनात येथील शेतकरी आघाडीवर आहेत. कृषी तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास ते कृषी क्षेत्रात क्रांती करतील इतकी त्यांच्यात क्षमता आहे. लोकमत आणि शासनाचा कृषी विभाग यांनी आयोजित केलेले प्रदर्शन महत्त्वाचे आहे.
-  बसवराज बिराजदार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

कोल्हापूर, बार्शी व अन्य ठिकाणी शेतकºयांना कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी पैसे खर्च करून जावे लागते. मात्र पंढरपूरमध्ये लोकमतने कृषी प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचा सर्व क्षेत्रातील शेतकºयांना लाभ घेता येणार आहे. तसेच शेतकºयांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामुळे लोकमतचे आभार.
- वसंतराव देशमुख
उपाध्यक्ष, पांडुरंग कारखाना, श्रीपूर

दुष्काळातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी लोकमतच्या अ‍ॅग्रोत्सवातून कृषी तज्ज्ञांचे अनमोल मार्गदर्शन मिळणार आहे. डाळिंबाचे दर घसरले आहेत, निर्यात घटली आहे, त्यात वाढ करण्याविषयी या अ‍ॅग्रोत्सवाला अधिक महत्त्व आहे. थेट शासनापर्यंत डाळिंब उत्पादकांच्या व्यथा मांडण्यासाठी लोकमतचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष
 अ. भा. डाळिंब उत्पादक शेतकरी संघ

Web Title: lokmat agrostav; Krishi Mahotsav in Pandharpur, connecting Solapur, Pomegranate, Sugarcane, and Grape to modern technologies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.